नाशिक : ख्रिसमस ट्रीसह सजावटीच्या वस्तूंना वाढली मागणी sakal
नाशिक

नाशिक : ख्रिसमस ट्रीसह सजावटीच्या वस्तूंना वाढली मागणी

नाताळनिमित्त चर्चमध्ये होणार विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ख्रिसमस नाताळवर गेल्या वर्षी कोरोनाचे सावट होते. यंदा निर्बंध शिथिल झाल्याने ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण कोरोना नियमांचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नाताळनिमित्त बाजारपेठही सजली असून, सजावटीच्या वस्तूंना चांगली मागणी असल्याचे दिसत आहे. नाताळनिमित्त शहराच्या विविध भागांतील चर्चमध्ये अनेक उपक्रम राबविण्यात येणार असून, त्या अनुषंगाने तयारीला सुरवात झाली आहे.

नाताळच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध चर्चमध्ये विद्युत रोषणाईदेखील करण्यात येणार आहे. येत्या २४ डिसेंबरपासून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने चर्चच्या व्यवस्थापकांनी तयारी करण्यास सुरवात केली आहे. नेहमी २४ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवाला यंदा ब्रेक लागला असून, २४ ते २७ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहे.

तीस टक्क्यांनी वस्तू महाग

नाताळच्या पार्श्‍वभूमीवर ख्रिस्ती बांधव घर सजावटीवर भर देतात. आतापर्यंत या वस्तू चीनमधून येत होत्या; परंतु चीनमधून येणाऱ्या वस्तू बंद झाल्यामुळे आता जपान, तैवानमधून वस्तू येत आहेत. त्यामुळे साधारण तीस टक्क्यांनी वस्तू महाग झाल्या आहेत.

कोरोनामुळे दोन वेळा होणार प्रार्थना

ख्रिसमस नाताळनिमित्त शरणपूर रोडवरील आंद्रिया चर्चमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. २५ डिसेंबरला सकाळी सात आणि नऊला ख्रिस्ती बांधव प्रार्थना करण्यासाठी येणार आहेत. तत्पूर्वी, २४ डिसेंबरला रात्री साडेदहाला वॉच नाइट सर्विस होईल. तर २६ डिसेंबरला दुपारी तीनला लहान मुलांसाठी व २७ डिसेंबरला महिला-पुरुष-तरुण यांच्यासाठी प्रार्थना, आराधना होईल. कोरोनाचे सर्व नियम पाळून नाताळ सण साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आंद्रिया चर्चचे अध्यक्ष प्रवीणकुमार घुले यांनी दिली.

"नाताळनिमित्त येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा, विविध रंगाचे स्टार, लायटिंग, गार्लिंग, ख्रिसमस ट्री आदी वस्तूंना मागणी आहे. यंदा सजावटीच्या या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. ख्रिसमस ट्री ५० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे."

-आशिष दिवेकर, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''जर इराणने माझी हत्या केली तर...'' डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सांगितला पुढचा प्लॅन

Numerology : 'या' मुलांकाचे पुरुष लग्नानंतर बदलून टाकतात बायकोचं आयुष्य; फक्त चूल-मुल न बघता 'तिला' पोहोचवतात यशाच्या शिखरावर

शाळा शिक्षणासाठी, राजकारणासाठी नाहीत! शाळेत मुख्यमंत्री विजय यांचा कार्यक्रम दाखवण्याऱ्या मुख्यध्यापकावर कारवाई, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना मोठा दिलासा; ठाण्यात तिकटीसाठी ११ ते ३१ जुलैदरम्यान अतिरिक्त आरक्षण खिडक्या, तीन गाड्यांचा थांबा..

SCROLL FOR NEXT