धुळे ः टुडे १ साठी, अँकर
---
जिल्ह्यासाठी साडेनऊ कोटींचा कृषी निधी मंजूर
फलोत्पादनासह कृषी विकास योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्जाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (२०२६-२७) जिल्ह्याला विविध घटकांसाठी ९ कोटी ४४ लाख २४ हजार रुपयांचा आर्थिक लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अधिकाधिक ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी केले आहे.
या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वनपट्टेधारक तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी लक्षांक निश्चित करण्यात आला असून, त्यांना विविध कृषी घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. योजनेतील प्रमुख समाविष्ट घटक- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : फळे, फुले व मसाला पिकांचा क्षेत्रविस्तार, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, हरितगृह, शेडनेट हाऊस, कांदाचाळ, पॅक हाऊस आणि पीक आच्छादन (मल्चिंग). राष्ट्रीय कृषी विकास योजना- कांदाचाळ उभारणी, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण आणि डाळिंब व द्राक्ष बागांसाठी ‘अँटी हेलनेट कव्हर’ (गारपीट प्रतिबंधक जाळी).
अर्ज कोठे करावा?
योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन संबंधित घटकांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
---
१४-१
चौकट
असे मिळणार अनुदान (घटकनिहाय मर्यादा)
घटक..................................कमाल मर्यादा/तपशील.................अनुदानाची रक्कम
कांदाचाळ उभारणी...................२५ व ५० मेट्रिक टन क्षमता...........प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण......मार्गदर्शक सूचनांनुसार..................कमाल ७५ हजार रुपये
अँटी हेलनेट कव्हर...................डाळिंब व द्राक्ष बागांसाठी...............प्रतिचौरस मीटर १०६.१६ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.