नाशिक

दप्तराची प्रतीक्षा कायम

CD
धुळे : टुडे १ साठी...ॲंकर --- लोगो.....गरजेनुसार समर्पक लोगो घेणे... --- जिल्ह्यात दुसऱ्या सत्रातही दप्तराची प्रतीक्षा कायम दिवाळीनंतर शासकीय अनुदानातून विद्यार्थ्यांना मिळणार बूट-मोजे अन् दुसरा गणवेश सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके मिळावीत, यासाठी यंदा शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले होते. शाळा सुरू होऊन पाच महिने उलटले आणि दिवाळीची सुटी संपण्यात जमा आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांसाठी बूट-मोज्यांसाठी शासनाकडून अनुदान मिळाले असून, यात १७० रुपये प्रतिविद्यार्थी अनुदान प्राप्त झाले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक जोड बूट आणि दोन जोडी मोजे मिळणार आहेत. तसेच दुसरा गणवेश असणार स्काउट व गाइडचा गणवेश देखील विद्यार्थ्यांची हाती पडणार आहे. मात्र दफ्तराची प्रतीक्षा अद्याप कायम असून, शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने विद्यार्थ्यांपर्यंत दप्तर पोहोचलेले नाही. महागाईच्या काळात मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. विशेषतः मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांना शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याची योजना राबविली जाते. स्काउटचा आकर्षक पोशाख समग्र शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आलेल्या नियोजनामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक जोड गणवेश आणि पाठ्यपुस्तके मिळाली. आता दुसऱ्या गणवेशाचे पैसे प्राप्त झाल्याने दिवाळी सुटीनंतर दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती दुसरा गणवेश पडणार आहे. हा दुसरा गणवेश स्काऊट व गाइडचा असून, यामध्ये मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळी हाफ पँट तर मुलींसाठी आकाशी शर्ट व गडद निळा स्कर्ट असलेला पिनो फ्रॉक किंवा गडद निळी सलवार व आकाशी कमीज (पंजाबी ड्रेस) असा आकर्षक पोशाख निश्चित केला आहे. साहित्य वाटप रखडले दुसऱ्या गणवेशाचा आणि बूट-मोज्यांचा प्रश्न मार्गी लागला असला तरी दप्तराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. शैक्षणिक वर्षाचा निम्मा कालावधी संपत आला तरी दप्तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. दप्तर वाटपासाठी शासनाकडून अद्याप निधी उपलब्ध झालेला नसल्याने शिक्षण विभागालाही पुढील प्रक्रिया करता आलेली नाही. निधी वितरणातील या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. --- १४-१ चौकट तालुकानिहाय लाभार्थी विद्यार्थी धुळे जिल्ह्यातील एक हजार १११ नियमित आणि आठ ‘पीएमश्री’ शाळांमधील एकूण ८० हजार ८३५ विद्यार्थ्यांना पहिला गणवेश मिळाला आहे. आता या सर्व विद्यार्थ्यांच्या हाती दुसरा गणवेश आणि बूट-मोजे देखील पडणार आहे. यात साक्री तालुक्यातील ४४२ शाळांमधील २५ हजार ७४४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. शिरपूर तालुक्यातील २७८ शाळांमधील २२ हजार ९२ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. धुळे तालुक्यातील २२४ शाळांमधील २१ हजार ६६२ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला, तर शिंदखेडा तालुक्यातील १७५ शाळांमधील ११ हजार ३३७ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

Latest Marathi News Live Update : अमित शाह यांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

Bollywood Sad News : "ती जाणार नाही असं वाटलं होतं..."; लाडक्या मुलीच्या कॅन्सर निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अश्रूंचा बांध फुटला!

SCROLL FOR NEXT