post letter esakal
नाशिक

Digital Post Office: स्वातंत्र्यदिनी डिजिटल टपाल कक्ष होणार कार्यान्वित! महसूल कार्यालयात मिळणार हायटेक सेवा

सकाळ वृत्तसेवा

Digital Post Office : नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांचे आणि ५४ तालुक्यांचे प्रशासकीय कार्यक्षेत्र असणाऱ्या नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालय नाशिक रोड येथे १५ ऑगस्टपासून हायटेक डिजिटल टपाल कक्ष कार्यान्वित होणार आहे.

नागरिकांनी आपले गाऱ्हाणे तक्रार अथवा इतर दस्तऐवज महसूल कार्यालयात जमा केल्यावर त्याचे वर्गीकरण होऊन डिजिटलायझेशन होणार आहे व आपले काम कोणत्या पातळीवर आहे, हे डिजिटल माध्यमांनी समजणार आहे. (Digital Post Office will be operational on Independence Day Hitech services available in revenue office nashik)

नाशिक रोडच्या विभागीय महसूल कार्यालयात सध्या जलद पातळीवर टपाल कक्षाचे काम सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातून नागरिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात येतात. अनेक वेळा निवेदन, तक्रार किंवा कामासंबंधी दस्त कार्यालयात जमा केल्यावर त्याचे स्टेट्स समजत नाही.

कामाला किती दिवस लागतील अथवा काम कुठपर्यंत आले आहे, याची माहिती नागरिकांना नसते. म्हणून आता टपाल कक्षात कागद जमा केल्यावर तो कोणत्या विभागात गेला, कोणत्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर आहे, काम कुठपर्यंत आले आहे, हे आता नागरिकांना डिजिटयझेशनद्वारे समजणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिवाय टपाल कक्षात कागद जमा केल्यावर संबंधित विभागात तो स्थलांतरित केला जाणार आहे. नागरिकांना आपल्या कामाच्या विकासाची पातळी या माध्यमातून समजणार आहे. १५ ऑगस्टपासून हा कक्ष नागरिकांच्या सेवेला उपलब्ध असणार आहे.

"टपाल कक्षाचे काम सुरू असून नागरिकांना डिजिटल हायटेक सेवा महसूल कार्यालयाकडून मिळावी म्हणून सुविधा निर्माण करण्यात येत आहे. हा कक्ष १५ ऑगस्ट पासून नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित होईल." - रमेश काळे, उपायुक्त, महसूल आयुक्त कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशी IN... पण, ना संजू OUT, ना अभिषेक..! भारताच्या Playing XI मध्ये दोन खेळाडूंचे पदार्पण होणार

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Mobile Restart : मोबाईल कधी रिस्टार्ट करावा अन् कधी नाही? आत्ताच घ्या जाणून नाहीतर फोन होऊ शकतो खराब

Latest Marathi News Update : पंढरपुरात पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT