Directional boards covered with greeting boards at Bitko Chowk and Datta Mandir Chowk. esakal
नाशिक

Nashik News: बॅनरबाजीमुळे झाकले दिशादर्शक फलक!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवर महापालिकेकडून परवानगी अथवा कर न भरता राजकीय पुढाऱ्यांकडून सर्रास बॅनरबाजी केली जात आहे.

येथील दत्तमंदिर सिग्नलच्या जवळ असणाऱ्या बॅनरवर सध्या राजकीय पुढाऱ्‍यांनी अनधिकृत शुभेच्छा फलक लावले आहे.

तसेच बिटको चौकातही अनधिकृत शुभेच्छा फलक सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिका मात्र अनधिकृत फलकांकडे सर्रास डोळेझाक करताना दिसत आहे. (Directional boards covered by banners Nashik News)

नाशिक रोड हे पंचवटी मतदारसंघाबरोबरच देवळाली मतदारसंघ व नाशिक मध्य मतदारसंघाचे प्रवेशद्वार समजले जाते. यामुळे अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्या पुढाऱ्‍यांची संख्या नाशिक रोडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.

येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुढाऱ्यांची बॅनर लावण्याची स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एका बाजूला स्मार्टसिटीच्या दिशेने नाशिकची वाटचाल होत असताना मनपाचे कररूपी लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. नाशिक - पुणे महामार्गावरील प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि प्रवाशांना दिशादर्शक फलक दिसत नाही.

पर्यायाने अनेक वेळा वाहने रस्ता चुकत आहे. बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दत्तमंदिर चौक, सिन्नर फाटा, सैलानी बाबा चौक, अनुराधा चौक, दत्तमंदिर रोडवरील जैन मंदिर चौकात स्वयंघोषित पुढाऱ्यांकडून सध्या होर्डिंगची स्पर्धाच सुरू आहे.

यामुळे संपूर्ण नाशिक रोड परिसराचे विद्रूपीकरण झाले असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT