nashik municipal corporation
nashik municipal corporation esakal
नाशिक

आपत्ती व्यवस्थापन आराखडा उतरला कागदावर; महापालिकेची खबरदारी

विक्रांत मते

नाशिक : नेमेची येतो पावसाळा याप्रमाणे महापालिका प्रशासनानेदेखील दरवर्षीप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन आराखडा कागदावर उतरविला आहे. आपत्ती उद्‌भवल्यास विभागवार जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. पावसाळ्यात चोवीस तास हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला असून, दुर्घटना घडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Disaster management plan in NMC for monsson)

आराखड्यात महत्त्वाच्या बाबी समाविष्ट

आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात महत्त्वाच्या बाबी समाविष्ट केल्या आहेत. स्थलांतरित नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करणे, पाणी साचलेल्या ठिकाणी मार्ग प्रवाहित करणे, धरणातून सोडलेल्या पाण्याची माहिती नियंत्रण कक्षाला देणे, जलवाहिन्यांची दुरुस्ती करणे, ड्रेनेजचे चोकअप काढणे, धोकादायक घरांना नोटीस देणे, काझीगढी मिळकत धारकांना नोटिसा बजावणे, पडलेले विद्युत खांब हलविणे, विद्युत पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करणे, घंटागाडी सुरळीत ठेवणे, पूर ओसरल्यानंतर नदीकाठचा कचरा हटविणे, वैद्यकीय अधिकारी व नर्सेस यांची टिम सज्ज ठेवणे, साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवणे, रुग्णालयांमध्ये माहिती केंद्राची निर्मिती करणे, वैद्यकीय पथकाची नियुक्ती करणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यरत ठेवणे, रस्त्यावर पडलेल्या झाडे हटविणे, अग्निशमन दल मुख्यालयात चोवीस नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश केला आहे.

पथदीपापासून दूर राहा

महापालिकेच्या पथदीपांना ३ फेज ४४० व्होल्टचा वीजपुरवठा करण्यात आलेला आहे. पावसाळ्यात खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करू नये, विनापरवाना विद्युत पुरवठा घेऊ नये, जनावरे विद्युत दिव्याच्या खांबाला बांधू नये, जंक्शन बॉक्सवर पाय ठेऊन खांबावर चढू नये , कपडे वाळविण्यासाठी पोलला तारा बांधू नये, पोलवर फ्लेकस किंवा होर्डिंग बांधू नये, केबल तारा खांबावरून ओढू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वित्त व जीवित हानी झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असे विद्युत विभागाकडून कळविण्यात आले आहे.

(Disaster management plan in NMC for monsson)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT