Discussion between the mayor and the commissioner about the lockdown Nashik Marathi News 
नाशिक

लॉकडाउनबाबत महापौर-आयुक्तांमध्ये चर्चा; कोविड सेंटर तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश 

विनोद बेदरकर

नाशिक : कोरोना रुग्णवाढीत देशात पहिल्या दहात असलेल्या नाशिक महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाउन करण्याचा विचार सुरू आहे. शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कमी पडत असल्याने गुरुवारी (ता. २५) महापौर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त कैलास जाधव यांच्यात बैठक होऊन त्यात फेरलॉकडाउनबाबत चर्चा झाली. 

शहरात लसीकरण व तपासणी केंद्रवाढ व्हावी, बाधित घराबाहेर फिरत असल्याने त्यांचा इतरांशी संपर्क होऊन रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंचवटीतील मेरीच्या पंजाबराव देशमुख, तपोवन येथील स्वामिनारायण शाळा, समाजकल्याण, ठक्कर डोम इत्यादी ठिकाणी कोविंड सेंटर सुरू करून सुविधा पुरवून कोविड सेंटर तातडीने कार्यान्वित करण्याचे महापौर कुलकर्णी यांनी निर्देश दिले. 

नऊ मोठ्या शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त

हॉस्पिटलला संपर्क करून रुग्ण ॲडमिट करू शकतील. तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडबाबतची ही व्यवस्था वेळच्या वेळी नागरिकांकरिता माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात यावी. भारतामध्ये नऊ मोठ्या शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. यात नाशिक शहराचाही समावेश असल्याने गंभीर महापालिका यंत्रणा सक्रिय दिसावी. दंडात्मक कार्यवाही करावी. व्यापारी पेठा, भाजी बाजार आदी ठिकाणी लावलेले अंशतः लॉकडाउन याबाबत पुन्हा नव्याने फेरविचार करण्याचा सूर महापालिका यंत्रणेने आळविला. शुक्रवारी (ता. २६) जिल्हा प्रशासनासमोर हा विषय मांडायचे ठरले. आढावा बैठकीला महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष गणेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे आदी उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारतमधील जेवणात सापडलं झुरळ, प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ, IRCTC कडून मोठी कारवाई

Success Story: ना ऑफिस, ना स्टाफ.. एआयच्या मदतीने दररोज कमावतोय २८ कोटी रुपये; कंपनी विकते 'हे' प्रॉडक्ट

Akshaya Tritiya 2026: 19 की 20 एप्रिल, कधी आहे अक्षय तृतीया? गोंधळ दूर करून जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि खास योग

Latest Marathi News Live Update : पुण्यातील कोपा मॉल उडवून देण्याची धमकी

Umarga Crime : उमरगा तालुका हादरला! बेरडवाडीत पतीने केली पत्नी आणि आठ वर्षाच्या चिमुकलीची कुऱ्हाडीने हत्या

SCROLL FOR NEXT