resign esakal
नाशिक

नाशिकच्या जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्रमुखांचा राजीनामा

अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाचे प्रमुख प्रशांत वाघमारे यांनी मंगळवारी (ता. २७) पदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपासून बरे वाटत नसल्‍याचे कारण देताना त्‍यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपूर्द केला. असे असले तरी कामावर गैरहजर राहिल्‍याबाबत नोटीस बजावल्‍यानंतर वाघमारे यांनी राजीनामा दिल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. (Nashik-District-Disaster-Management-Chief-resigns-marathi-news-jpd93)

आजारपणाचे कारण; नोटिसीनंतर तडकाफडकी निर्णय

राज्‍यभरात अतिवृष्टीने गंभीर परिस्‍थिती निर्माण झाली आहे. जिल्‍ह्यात ब्रह्मगिरी परिसरात सोमवारी (ता. २६) दरड कोसळल्‍याच्‍या घटनेत दोन जखमी झाले होते. तसेच यापूर्वी इगतपुरी- कसारा घाटात दरड कोसळल्‍या आहेत. दरड कोसळणे व पूरस्‍थितीचा संभाव्‍य धोका लक्षात घेता, मंगळवारी जिल्‍ह्यात तीन ठिकाणी मॉकड्रिल राबविण्यात आले. रंगीत तालीम सुरू असताना, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या परिस्‍थितीवर लक्ष ठेवणे अपेक्षित होते. मात्र, आपत्ती व्‍यवस्‍थापनप्रमुख प्रशांत वाघमारे कार्यालयात उपस्‍थित नव्‍हते. आजारी असल्‍याने उपस्‍थित नसल्‍याचे कारण त्‍यांनी दिले. दरम्‍यान, जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भात लेखी खुलासा करण्यासंदर्भात नोटीस बजावली. यानंतर तडकाफडकी श्री. वाघमारे यांनी राजीनामा दिला.

गेल्‍या १३ वर्षांपासून जिल्‍हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्‍यवस्‍थापन कक्षप्रमुख म्‍हणून काम बघत आहे. गेल्‍या वर्षी उत्‍कृष्ट कामाचा गौरव झाला आहे. बरे वाटत नव्‍हते. अशात जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी नोटीस बजावल्‍याने अस्‍वस्‍थ झालो व राजीनामा दिला. -प्रशांत वाघमारे, आपत्ती व्‍यवस्‍थापन विभाग

काही दिवसांपासून वाघमारे कामावर नव्‍हते. त्‍यांना यासंदर्भात विचारणा केली व कारणे नोटीस बजावल्‍यानंतर त्‍यांनी राजीनामा दिला. संबंधित पद कंत्राटी स्‍वरूपाचे असून, जाहिरात प्रसिद्ध करत सक्षम उमेदवारांची नियुक्‍ती केली जाईल. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT