धुळे ः टुडे २ साठी
---
फोटो क्रमांक ः 34939
धुळे : खानदेश यूथ फाउंडेशनतर्फे झालेल्या दिवाळी सांज पाडवा कार्यक्रमावेळी उपस्थित क्षितिज साळुंके व फाउंडेशनचे सदस्य.
---
यूथ फाउंडेशनतर्फे पाडवा मैफल
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ ः मेट्रो शहरांतील तरुणाईत लोकप्रिय असलेला ‘म्युझिक जॅमिंग’चा (संगीत मैफल) ट्रेंड खानदेश यूथ फाउंडेशनने धुळ्यात यशस्वीरीत्या रुजविला आहे. फाउंडेशनतर्फे पांझरा नदीवरील पांझरेश्वर महादेव पुलावर झालेल्या दिवाळी सांज पाडवा या भक्तिमय संगीत मैफलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सलग दुसऱ्या वर्षी झालेल्या या अभिनव उपक्रमाला असंख्य रसिकांनी हजेरी लावली.
रायजिंग स्टार म्युझिक ॲकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या बहारदार आणि भक्तिमय गीतांनी पांझरेश्वर पूल परिसर मंत्रमुग्ध झाला. धुळे शहराबद्दल अनेकदा नकारात्मक चर्चा ऐकायला मिळते; मात्र तरुणांनी एकत्र येऊन शहरात सकारात्मक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण केले, ही कौतुकास्पद बाब आहे, अशी भावना उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईने व्यक्त केली. खानदेश यूथ फाउंडेशनचे संस्थापक क्षितिज साळुंके आणि सदस्यांनी संयोजन केले. फाउंडेशनतर्फे यापूर्वी ‘उडाण’ उपक्रमांतर्गत नागरी उड्डाण क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन, नवउद्योजकांना अनुभवी उद्योगपतींशी जोडणारे ‘टॉक शो’, तसेच खानदेशातील सर्वांत मोठे वक्तृत्व व्यासपीठ असलेली शब्दभूषण स्पर्धा राबविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.