16226
मालेगाव : दिवाळी सणानिमित्त चालक, वाहकांना मिठाई वाटप करतांना रोटरी मिडटाऊनचे पदाधिकारी
रोटरी मिडटाऊनतर्फे
चालक वाहकांना मिठाई
सकाळ वृत्तसेवा
सोनज, ता. १३ : दिवाळी सणात येथील आगारातील एसटीच्या चालक वाहक यांना रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली. समाजातील सर्वजण आपापल्या घरी आनंदाने सण साजरा करत असताना. मात्र, एसटीचे चालक वाहक मात्र भावाला बहिणीकडे आणि बहिणीला भावाकडे नेण्याचे पवित्र काम दिवाळीच्या निमित्ताने एकही दिवस सुट्टी न घेता अखंडित करीत असतात. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून गेल्या २६ वर्षांपासून रोटरी मिडटाऊनच्या वतीने मिठाई आणि फराळ वाटप केले जाते.
ही आगळीवेगळी परंपरा कायम ठेवून यावर्षी देखील क्लबतर्फे हा प्रकल्प राबवण्यात आला. यंदा मालेगावच्या नवीन बसस्थानक येथे फराळ आणि मिठाईची पाकीटे चालक आणि वाहकांना वितरित करण्यात आले. याप्रसंगी मामको बँकेचे अध्यक्ष भिका कोतकर यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, सचिव राहुल कदम, राजेंद्र भामरे, सतीश कलंत्री, प्रकल्प अध्यक्ष दिनेश सोनवणे, गणेश बोरसे, आगार व्यवस्थापक विजय पाटील उपस्थित होते.
यावेळी भिका कोतकर, विजय पाटील, सतीश कलंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रोटरी मिडटाऊन च्या वतीने दरवर्षी होत असलेल्या उपक्रमामुळे सर्व चालक वाहकांना प्रचंड समाधान आणि आनंद मिळत असल्याचे आगार व्यवस्थापक पाटील म्हणाले.
२६ वर्षे क्लबच्या माध्यमातून अखंडितपणे बस चालक वाहक यांना मिठाई व फराळ वाटप करण्यात येते. यावर्षी देखील मिठाईचे वितरण करण्यात आले.
- राजेंद्र जाधव, अध्यक्ष, रोटरी मिडटाऊन, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.