सिन्नर : वावी पोलिसांनी जप्त केलेला अवैध दारूचा साठा.
सिन्नर : वावी पोलिसांनी जप्त केलेला अवैध दारूचा साठा. esakal
नाशिक

Nashik News : देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त; एकास अटक

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील वावी येथे अवैध विक्रीसाठी साठवलेला देशी विदेशी मद्याचा सुमारे पाऊण लाखांचा साठा पोलिसांनी जप्त केला. वावी येथील पाहुणचार हॉटेल मागे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकास अटक केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या सूचनेवरून अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी ही कारवाई केली.

सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी गावाजवळील हॉटेल पाहुणचार परिसरात अवैध दारू विक्री करण्यात येत होती. या ठिकाणी अवैधरीत्या देशी-विदेशी दारूचा मोठा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवळी यांना मिळाली होती. (Domestic and foreign liquor stocks seized, police action arrests one Nashik News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यांनी वरिष्ठांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिस पथकाने पाहुणचार हॉटेल परिसरात तपासणी केल्यावर जवळच असलेल्या झोपडीमध्ये देशी व विदेशी दारूचे सुमारे ७४ हजार रुपये किमतीचे २१ बॉक्स मिळून आले.

या कारवाईत संतोष शिवदास क्षत्रिय यास अटक करून त्यांचे विरोधात वावी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक प्रकाश गवळी, विजय सोनवणे, नितीन मैद, शैलेश शेलार, भास्कर जाधव, गोविंद सुर्यवाड, रत्नाकर तांबे यांनी यांचा पथकात समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT