Dr Bharti Pawar esakal
नाशिक

Dr. Bharati Pawar : नाशिकला कोविड पॉझिटीव्हीटी दर 5 टक्के : डॉ. भारती पवार

सकाळ वृत्तसेवा

Dr. Bharati Pawar : देशात कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. त्याचाच आढावा घेण्यासाठी आज देशभर कोविड मॉकड्रील झाले. राज्यात नाशिकला कोविडचा पॉझिटीव्हीटी दर पाच टक्केच आहे.

कोविडचा नवा विषाणू गंभीर नाही पण त्याचा प्रसार मात्र खूप गतीने होतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी गरजेनुसार मास्कचा वापर केला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. (Dr Bharati Pawar statement Nashik Covid positivity rate 5 percent nashik news)

जगातून कोविड प्रादुर्भाव कायम आहे. नाशिकला नव्या व्हेरिएंटचे ८६ रुग्ण आढळले त्यातील अवघे दोनच रुग्ण ॲडमिट आहे. नवीन व्हेरिएंट फार गंभीर नाही. पण त्याचा प्रसार मात्र खूप गतीने होतो त्यामुळे काळजी घेतली पाहिजे.

राज्यात ११ ते १२ जिल्ह्यात पॉझिटीव्हीटी दर १० टक्के आहे. अशा पार्श्वभूमीवर आज (ता.१०) कोरोना नियंत्रणासाठीच्या तयारीचा आढावा घेतला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

डॉ. पवार म्हणाल्या की, नाशिकला २१ हजार बेड उपलब्ध आहेत. आपत्तीकालीन स्थितीला तोंड देण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्राणवायू आहेत. साधारण ६०० मेट्रीक टन साठवणूक क्षमता आहे. जिल्ह्यात पहिल्या डोसचे ९० टक्के तर दुसरा डोस ८१ टक्के जणांनी घेतला आहे.

ग्रामीण भागात ४० बेड तयार आहे. ५८ व्हेंटिलेटर तसेच पुरेसा औषधाचा साठा आहे. ज्या भागात रुग्णसंख्येचा दर वाढत असेल तेथे स्थानिक प्रशासन मास्क वापरासह इतर काही नियम करू शकणार आहे., नागरिकांनी काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC Student Protest: विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला, JPSC च्या ३ सदस्यांचा राजीनामा; झारखंडमध्ये मोठी घडामोड

बुमराह, साई सुदर्शनसह स्टार्स दुखापतग्रस्त; VVS Laxman यांचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, 'CoE केवळ रिहॅब सेंटर नाही, तर...'

काजू कतली खरेदी केली अन् डब्यात आढळल्या जिवंत अळ्या; ग्राहकाच्या तक्रारीनंतर FDAची मॉलवर कारवाई

Chikhaldara Accident: सेल्फी घेताना तोल गेला अन् दरीत कोसळले; चिखलदऱ्यात बार्शीटाकळीतील ४० वर्षीय युवकाचा मृत्यू, मित्रांसोबत फिरायला गेले अन्..

Pune Nashik Highspeed Rail: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग बदलला; अमोल कोल्हेंच्या निष्क्रियतेमुळेच हे घडले, भाजपचा आरोप

SCROLL FOR NEXT