Dr Zakir Hussain Hospital latest marathi news esakal
नाशिक

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे पुन्हा कोविड सेंटरमध्ये रूपांतर

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे पुन्हा कोविड सेंटरमध्ये रूपांतर केले आहे. सध्या चार रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहे. कोरोना रुग्ण वार्डकडे जाण्यास मागील बाजूचा स्वातंत्र्य रस्ता खुला करावा. खालील मजल्यावरील अन्य वॉर्ड सामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. (Dr Zakir Hussain Hospital converted into Covid Center again nashik Latest Marathi News)

शहरात दैनंदिन ५० किंबहुना त्यापेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहे. येणाऱ्या दिवसातही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे पुन्हा कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

सध्या चार रुग्ण वरील मजल्यावर उपचार घेत आहे. अन्य रुग्णालय पूर्णपणे रिकामे आहे. दुसरीकडे जुने नाशिक परिसरासह लागून असलेल्या अन्य परिसरात महापालिका किंवा शासकीय रुग्णालय नाही. येथील रहिवासी कष्टकरी आहे.

त्यांना खासगी रुग्णालयाचा खर्च न परवडणारा आहे. त्यांची गैरसोय होत आहे. विशेष करून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची. त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिका वैद्यकीय विभागाकडून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय सामान्य रुग्णांसाठीदेखील उपलब्ध करून देण्यात यावे. रुग्णास असलेल्या तीन ते चार प्रवेशद्वारांपैकी मागील बाजूचे प्रवेशद्वार कोविड वार्डकडे जाण्यासाठी उपलब्ध करावे.

तर अन्य तीन प्रवेशद्वार सामान्य रुग्णांच्या वार्डाकडे जाण्यास खुले करून देण्यात यावे. ऍडमिट करून घेण्याची आवश्यकता असलेल्या सामान्य रुग्णांना खालील मजल्यावर दाखल करून घेण्यात यावे. सध्या पावसाळ्यामुळे विविध आजारांमध्ये वाढ झाली आहे.

त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. ज्यावेळेस रुग्णांची संख्या अधिक वाढून कोरोना वॉर्ड कमी पडू लागेल. त्यावेळेस संपूर्ण रुग्णालय कोविड करण्यात आले तरी चालेल, परंतु सध्या तरी सामान्य रुग्णांसाठी खुले करावे, अशी मागणी विविध पक्ष पदाधिकारी आणि नागरिकांकडून करण्यात आली आहे.

"पावसाळ्यामुळे विविध रुग्णांची संख्या वाढली आहे. परिसरातील गोरगरीब महिलांना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात जाणे परवडत नाही. यासाठी महापालिकेने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाच्या वरील मजल्यावर कोरोना रुग्णांचा वॉर्ड केला आहे. त्यास स्वातंत्र्य मार्ग देऊन रुग्णालयातील इतर रिकाम्या वॉर्डात सामान्य रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याची सोय करावी." - झुबेर हाश्मी, सामाजिक कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT