पान-२ मेन करणे-- चित्र शेतकरी आणि फार्मर आयडीचे
------------------
दुष्काळी मदतीपासून २३ हजार शेतकरी वंचित
-------------
सिन्नर तालुका ः फॉर्मर आयडी नसणे, कागदपत्रांतील त्रुटीमुळे अडथळा, दुरुस्तीचे आवाहन
------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१३ ः सिन्नर तालुक्यात ७० हजार ७५७ शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सरकारने पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली होती. ही रक्कम तालुक्यात ४७ हजार ७१० शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. मात्र अजूनही २३ हजार ४७ शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. फार्मर आयडी नसल्याचे कारण त्यासाठी सांगितले जात आहे.
---------------
राज्य शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची दुष्काळ अग्रिम मदत अद्याप तालुक्यातील ३२ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. दिवाळीचा सण उलटून गेला तरी तांत्रिक अडचणी, ''पोर्टलवर नावे नसणे'' आणि ई- केवायसीच्या फेऱ्यांमुळे बळीराजा मदतीपासून वंचित राहिला असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
तालुक्यात आतापर्यंत ४७ हजार ७१० शेतकऱ्यांच्या खात्यावर २३ कोटी, ८५ लाख रुपयांची मदत जमा झाली आहे. उर्वरित ३२ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. तांत्रिक अडचणींसह कागदपत्रांची पूर्तता नसल्याने रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत विशेष मोहीम राबवून पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासह मदत बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करावी, शेतकऱ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे घ्यावीत, अशी मागणी होत आहे.
१६-१
पोर्टलला नावे नसल्याची कारणे
अँग्रीस्टँक अंतर्गत फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय मदतीसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. फार्मर आयडी नसलेले शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. सातबारा आणि आधार कार्डामधील नावातील तफावतीमुळेही मदत मिळण्यास अडचण येत आहे. संयुक्त खातेदारांची तांत्रिक अडचण असली तरी मदत जमा होण्यासाठी संमतिपत्र देणे आवश्यक आहे. बँकेत केवायसी केली नसल्यासही मदत जमा होण्यास अडचण येत आहे.
१६-१
मदत मिळण्यासाठी उपाययोजना
तलाठी, कृषी सहाय्यकांकडे जाऊन पोर्टलवर नाव अपलोड झाल्याबाबत खात्री करावी लागणार असून महाईसेवा केंद्रात जाऊन फार्मर आयडी, केवायसी पूर्ण असल्याचे पहावे लागेल, ती नसल्यास ती प्रक्रिया आधी पूर्ण करणे गरजेचे आहे. आधारकार्ड, सातबारा उताऱ्यावरील नावात तफावत असल्यास ती दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे.
---------------
कोट
कागदपत्राची पूर्तता करावी
दुष्काळी मदत मिळण्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. संयुक्त खातेधारकांनी संमतिपत्र भरुन देणे अनिवार्य आहे. त्यानंतर ही मदत मिळू शकेल.
- सुरेंद्र देशमुख, तहसीलदार, सिन्नर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.