नाशिक

गोशाळा अनुदान मागणी

CD
धुळे : टुडे पान २ साठी... --- फोटो क्रमांक : 35060 धुळे : गोशाळांतील पशूसाठी अनुदान वाढवून मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करताना गोशाळा महासंघाचे पदाधिकारी, संचालक आदी. --- गोशाळांतील प्रत्येक पशूसाठी रोज १०० रुपये अनुदान द्या दुष्काळामुळे चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गोशाळांमधील पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडे नोंदणीकृत राज्यातील एक हजार १४ गोशाळांमधील प्रत्येक पशूसाठी प्रतिदिन १०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी गोशाळा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. अल्प पावसामुळे शेतांमध्ये चारा, कडबा व कुटार उपलब्ध होत नसून पडीत जमीन, डोंगराळ भाग व जंगलांमध्येही चारा उगवलेला नाही. परिणामी, चाऱ्याचे दर वाढले आहेत. शासनाकडेही पुरेसा चारासाठा नसल्याने आगामी काळात पशुधनाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव व धरणांमधील पाणीसाठाही घटत असल्याने गोशाळांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्तरावर चारा डेपो सुरू करावा, अशी मागणीही महासंघाने केली. दुष्काळामुळे अनेक शेतकरी पशुधन गोशाळांमध्ये आणून देत आहेत. गोशाळा संचालक त्याचा स्वीकार करीत असल्याने अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक गोवंश जमा झाला आहे. त्यामुळे गोशाळांवरील आर्थिक भार वाढला आहे. आर्थिक अडचणींमुळे काही शेतकरी गोवंश विक्रीस काढत असून, खरेदीदार मिळत नसल्याने हे पशुधन कत्तलीसाठी जाण्याची शक्यताही महासंघाने व्यक्त केली आहे. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना अशा पशुधनाची वाहतूक करणारी वाहने गोरक्षकांनी पकडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नोंदणीकृत गोशाळांमधील पशुधनासाठी प्रतिदिन प्रतिपशू १०० रुपये याप्रमाणे चारा-पाणी अनुदान सरसकट वितरित करावे आणि त्याबाबत तातडीने शासन निर्णय घ्यावा, अशी मागणी महासंघाने केली. महासंघाचे अध्यक्ष निर्मल भटेवरा, उपाध्यक्ष सुनील चौधरी, सचिव पवन पोद्दार, जिल्हा समन्वयक मनोज सोनवणे आदींसह जिल्ह्यातील गोशाळा संचालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lek Ladki Yojana 2026 : लाडक्या लेकीच्या खात्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये! सरकारने अर्जाचे नियम केले सोपे; आता घरबसल्या असा करा अर्ज!

Gadchiroli Transformation : नक्षलवादाचा काळोख संपला! महाराष्ट्राचा 'हा' जिल्हा बनणार देशाची नवी 'स्टील सिटी'; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

हातगाडीवर भाजी विकत असतानाच लेक न्यायाधीश झाल्याची बातमी कळाली... आई-वडील भावूक... कधीकाळी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठीही नव्हते ८०० रुपये!

Marathwada Water Crisis: सरकारच्या दुर्लक्षाने मराठवाड्याचे ७ टीएमसी पाणी अडकले! दोन बोगद्यांची कामे ठप्प, पंपगृहही अपूर्ण; शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याला ब्रेक

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

SCROLL FOR NEXT