drug addict man stabbed to death in old nashik
drug addict man stabbed to death in old nashik  Sakal
नाशिक

नाशिक : नशेबाज तरुणांच्या भांडणात एकाचा चाकू भोसकून खून

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : दुधबाजार परिसरात आज संध्याकाळी (दि.१८) नशेच्या आहारी गेलेल्या दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीत एकाने धारदार हत्याराने वार केले. नितीन नितीन उर्फ सोनू बालाजी गायकवाड (रा. भारत नगर) असे मृताचे नाव आहे.

जुने नाशिक दूध बाजार चौकात ३५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवरी (ता.१८) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली. मृत नितीन तसेच संशयित आणि अज्ञात महिला असे तीन ते चार जण दूध बाजारातून जात असताना संशयित आणि मृत नितीन यांच्यात वाद झाला. संशयिताने त्याच्याकडील चाकू(कटर) ने मृताच्या पोटावर जोरदार वार केला. त्यात नितीन गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अमोल तांबे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर विजय ढमाळ, आनंद वाघ आचल मुदगल, पोलीस निरीक्षक दीपक ठाकूर यांच्यासह अन्य अधिकारी पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार मृत व संशयित व्हाइटनरचा नशा करणारे होते. काही दिवसापूर्वी देखील त्यांच्यात वाद झाल्याचे बोलले जात आहे. संशयिताने नितीन वर हल्ला करून फरार झाला आहे. अन्य एकास ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक चौकशी करत आहे. दरम्यान संशयितास पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. भद्रकाली तलावडी, नाशिकरोड अशा विविध भागात संशयितांचा शोध सुरू आहे. न्यायवैद्यक विभागाच्या पथकाकडून घनास्थळावरून रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान पोलिसांकडून परिसरातील दुकानांचे सीसीटीव्हीफुटेज तपासणी करण्यात आली असून त्यात एक महिला देखील त्यांच्या बरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या महिलेचा देखीलशोध सुरू आहे गुन्हा काही तासात उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुन्हा दाखल करण्याचे उशिरापर्यंत काम सुरू होते.

हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी

दूध बाजार पोलिस चौकी च्या अगदी जवळ खून झाला आहे. वर्धनी चे ठिकाण आणि पोलीस चौकी असताना देखील खुनाची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT