कोजागरीसाठी खानदेशातून कावडधारकांची सप्तश्रृंगी गडावर रिघ

Devotees from Khandesh have gathered at Saptashrungi gad for Kojagari festival
Devotees from Khandesh have gathered at Saptashrungi gad for Kojagari festival Sakal


पिंपळगाव (वा.) (जि. नाशिक) : पायातील घुंगरांची छमछम, सप्तश्रृंगी मातेचा जयघोष, ढोल ताशांचा गजर व डीजेवरील देवीच्या गाण्यांनी सप्तश्रृंगी गडाकडील रस्ते निनादून गेले असून, कावडीधारक व पायी येणाऱ्या यात्रेकरुंच्या गर्दीने गडाकडे येणारे रस्ते फुलले आहेत.
आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या कोजागरी उत्सवासाठी हजारो भाविक गडाकडे पायी निघाले आहेत.

‘बोल अंबे की जय, डोंगर हिरवागार, माय तुना डोंगर हिरवागार’ अशा गीतांवर नृत्य करीत आणि देवीचा जयघोष करीत निघालेल्या भाविकांमुळे नांदुरी गडाकडील रस्ते गर्दीने फुलले आहेत. मंगळवारी (ता. १९) विविध ठिकाणच्या जलाशयाने देवीवर जलाभिषेक होणार आहे. त्यामुळे खानदेशातून हजारो भाविक कावड घेऊन नांदुरीगडाच्या दिशेने रवाना झाले आहेत. भाविकांच्या गर्दीने कळवण - नांदुरीपर्यंतचा मार्ग भक्तांच्या गर्दीने फुलला आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्याची हद्द ओलांडत भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे नांदुरीच्या दिशेने निघाल्याने भक्ती आणि श्रद्धेचे अनोखे रूप पाहायला मिळत आहे. पायी अंतर चालतांना या भाविकांमध्ये महिला - पुरुष, अबाल वृद्ध सहभागी झाले आहेत. गोबापूर, आठंबे परिसरात या पदयात्रेला जणू काही विराट मोर्चाचेच रुप प्राप्त झाले होते. गडाकडे जाणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांमध्ये वेगळाच उत्साह बघायला मिळत आहे.

दरम्यान, आज (ता. १९) कोजागरी पौर्णिमा (अश्‍विन पौर्णिमा) उत्सव व कावड यात्रा सप्तशृंगगडावर होत आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेच्या कोजागरी पौर्णिमेनिमित्त अभिषेक विधी करण्यासाठी हजारो कावडीधारक घेवून गडाच्या दिशेने खानदेश प्रांतातील विविध ठिकाणांहून अनवाणी प्रवास करुन कोजागरीच्या पूर्वसंध्येस नांदुरी व परिसरात दाखल झाले आहे.

Devotees from Khandesh have gathered at Saptashrungi gad for Kojagari festival
नाशिकमध्ये डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान; शहरात डेंगीचे ९२० रुग्ण

पवित्र नद्यांच्या पाण्याने होणार जलाभिषेक...

मंगळवारी (ता. १९) सकाळी सप्तश्रृंगगडावर सकाळी सातला न्यासाच्या कार्यालयातून देवीच्या अलंकाराची सवाद्य मिरवणूक निघणार असून, सकाळी ७ ते नऊर्यंत देवीची पंचामृत महापूजा होणार आहे. दुपारी बाराला देवीची महानैवेद्य आरती व सांयकाळी सातला शांतीपाठाने देवीच्या कोजागरी उत्साहास प्रारंभ होईल. विविध ठिकाणच्या कावडीधारकांकडून संकलन केलेल्या पवित्र नद्यांच्या जलाने पुरोहित लाखो भाविकांच्या उपस्थित सप्तश्रृंगी देवीवर जलाभिषेक होणार आहे.

Devotees from Khandesh have gathered at Saptashrungi gad for Kojagari festival
कांदा दरवाढीचे आकांडतांडव नको : कृषिमंत्री दादा भुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com