shevga.jpg Sakal
नाशिक

शेवग्याला विक्रमी भाव; शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फुललं हसू

घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा

दाभाडी (जि. नाशिक) : मालेगाव तालुक्यातील जळगाव (गा) येथील विशाल आत्माराम अहिरे या उत्पादकाच्या शेवग्याला विक्रमी २२२ प्रतिकिलोचा भाव मिळाल्याने चर्चेला उधाण आले आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला शेवग्याच्या पहिल्याच तोड्याला अभूतपूर्व बाजारभाव मिळाल्याने अहिरे परिवाराला धनलक्ष्मी पावल्याने युवा उत्पादकाला आनंदाने गहिवरून आले.

मालेगाव तालुक्यातील जळगाव (गा) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आधार बाबा अहिरे यांचे नातू विशाल अहिरे यांनी पाच एकरात शेवग्याची लागवड केली आहे. परिसरात परतीच्या पावसाने यंदा भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मात्र अतिवृष्टीमुळे पिके हातचा जाण्याची भीती असतांना मोठ्या कष्टाने शेवग्याचे पीक जतन केले. या जगवलेल्या पिकाचा पहिला तोडा कर-अष्टमीच्या मुहूर्तावर मालेगावी दाखल केला. कमी आवकमुळे भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. भाव ही गगनाला भिडले आहेत. त्याचा प्रत्यय शेवग्याची पहिल्या बोलीला आला. शेवगा मालाची प्रत उजवी ठरल्याने व्यापारी अहमहमिकेने बोलीत सहभागी झाले. सरतेशेवटी लोणारी कंपनीचे दर्शन गेंद यांनी २२२ ची अंतिम बोलीने बाजारमूल्यावर शिक्कामोर्तब झाले. नमनालाच शेवग्याच्या रूपाने धनलक्ष्मी पावल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली. उत्पादक विशाल अहिरेंसोबत आलेल्या घनश्याम अहिरे, अतुल अहिरे या संवगड्यांना आलिंगन देत विक्रमी बाजारमूल्याचे स्वागत केले. ही वार्ता सर्वदूर पसरताच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून अहिरे परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. या निमित्ताने शेवग्याच्या बाजारभाव मूल्याची चित्रफीत सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे. अहिरे परिवाराचे कौतुक होत आहे.

शेवग्याच्या पहिल्याच तोडयाला विक्रमी भाव मिळाल्याने परिसरात कौतुक होत आहे. ऐन दिवाळीत लक्ष्मी पावल्याने आनंद द्विगुणीत झाला आहे.
विशाल अहिरे, - शेवगा उत्पादक, जळगाव(गा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT