Nashik Rain
Nashik Rain  Sakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका; ८७७ मेंढ्यासह बाराशेवर पशुधन मृत्यूमुखी

विनोद बेदरकर

नाशिक : शहर जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या पावसाने शेतीची दाणादाण उडविली आहे. शहरात साहित्य संमेलनाच्या स्वागतात प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असताना जिल्ह्यातील गावोगाव शेती पीक वाया गेल्याने शेतकरी मात्र हवालदिल आहे. हजारो हेक्‍टरवरील पिकांची वाट लागली असताना, जिल्हाभरात ८ ठिकाणी ८७७ मेंढ्या, २३ कोकर, २३ शेळ्या, १६ गायी, ३ वासर, १ म्हैस, २ बैल एवढ्या पशुधनाचा मृत्यू झाला.

पंचनाम्याची चिंता

पावसाच्या नुकसानीने हवालदिल झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची चिंता लागून आहे. बुधवारी पहाटेपासून सुरु असलेल्या पावसाने शेतीचे कंबरडे मोडले आहे. वीस ते बावीस हजार हेक्टरवरील द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. कांदे, भाजीपाला पिकासह कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. निफाडला १३२८ हेक्टरवरील कांदा व द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांसह कांद्याचे आणि शेतीपिकांचे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यत एकट्या निफाड तालुक्यातील शेतपिकांच्या नुकसानीचे चित्र पुढे आले आहे. प्रशासकीय यंत्रणा व बहुतांश महसूल यंत्रणा साहित्य संमेलनाच्या तयारीत व्यस्त असल्याने तूर्तास तरी शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकाऱ्यांना अजून सवड झालेली नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

पशुधनावर घाला

-दोन दिवसांचा पाऊस पशुधनावर घाला ठरला. तिसगाव (ता.चांदवड) गट न. ४१६ येथे २० मेंढ्यांचा मृत्यू, तळेगाव रोही सुभाष गाढे यांच्या १५ मेंढ्या थंडीमुळे मृत्युमुखी
- सुरेश संजय फटांगडे यांच्या वडाळीभोईत २५ मेंढ्याचा मृत्यू, सोमठान देश (ता येवला) येथे दोघांच्या १२ मेंढ्याचा मृत्यू झाला.
-वडगाव पिंगळा (ता.सिन्नर) येथे सुभाष महादू पवार यांच्या ५२, सावकी (ता.देवळा) योगेश मिश्राम गायकवाड यांच्या ६, शिंदवड (ता.दिंडोरी) १० , इंदोरे (ता. दिंडोरी) येथे १२ या प्रमाणे साधारण ८७७ मेंढ्या, २३ कोकर, २३ शेळ्या, १६ गायी, तीन वासर, एक म्हैस, दोन बैल एवढ्या पशुधनाचे चोवीस तासात नुकसान झाले.

तालुका मेंढ्या कोकर शेळ्या गाय वासर म्हैस बैल घरांची पडझड
मालेगाव २१९ १६ १२ ०२ ०२
येवला ४८
नांदगाव ३९ ०१
देवळा ११ ०४
बागलाण २९६ ०७ १३
चांदवड ७७ ०२ ०१
नाशिक ६६ ०३
कळवण २७ ०२
सिन्‍नर ७२


येवला तालुका
येवला - १९.०० मिमी
अंदरसुल १६.०० मिमी
नगरसुल १५.०० मिमी
पाटोदा - ३२.०० मिमी
सावरगाव - ३५.०० मिमी
जळगाव नेऊर २८.०० मिमी


त्र्यंबकेश्वर तालुका
त्र्यंबकेश्वर:- ६२.०० मिमी
वेळुंजे. :- ९२.०० मिमी
हरसूल. - ७८.०८ मिमी

पेठ तालुका
पेठ - ८१.२ मिमी
जोगमोडी - ९८.० मिमी
कोहोर - ८३.२ मिमी

चांदवड
चांदवड - ३४.० मिमी
दुगाव ३६.० मिमी
दिघवद -२८,० मिमी
वडाळीभोई २९.० मिमी
रायपूर ३२.०० मिमी
वडनेर भैरव ३७.०० मिमी


तालुका दिंडोरी
मोहाडी - ४२.० मिमी
उमराळे - ५४.० मिमी
कोशिंबे - ६९.० मिमी
ननाशी - ५९.० मिमी
वरखेडा - ३८.० मिमी
वणी -. १६.० मिमी
दिंडोरी - ४९.० मिमी
लखमापूर - ५३.०मिमी
रामशेज - ३०.० मिमी

नांदगाव तालुका
नांदगाव १५. ० मिमी
वेहेळगाव ७.० मिमी
जातेगाव ६.० मिमी
हीसवळ १४.० मिमी
मनमाड १८.० मिमी
एकूण - ६०. मिमी

निफाड तालुका
निफाड - २६.६० मी.मी
ओझर- ५०.०० मी.मी
लासलगाव ४७.६० मी.मी.
चांदोरी - ४६.२० मी.मी
सायखेडा ३९.०० मी.मी
रानवड - ४३.०० मी.मी
नांदूर म- ४१.३० मी.मी
पिंपळगाव-३८.०० मी.मी
देवगाव- ३५.०० मी.मी

कळवण तालुका
कळवण ४७.० मिमी
नवीबेज - ३९.०मिमी
दळवट - ३६.०मिमी
कनाशी - ४६.०मिमी
मोकभणगी -४८.० मिमी
अभोना ४७.० मिमी

देवळा तालुका
देवळा - ५९.२ मिमी
लोहणेर - ६४.०० मिमी
उमराने - ५७.०० मिमी

सिन्नर तालुका
सिन्नर - ३४.० मिमी
पांढुर्ली - ३४.० मिमी
नांदूर शिंगोटे - ३२.० मिमी
वावी २३.० मिमी
शहा - २५.३ मिमी
डुबेरे - ४१.२ मिमी
देवपूर - २७.२ मिमी


नाशिक तालुका
नाशिक - ४५.२० मिमी
गिरणारे - ७५.०१ मिमी
पाथर्डी- ६३.०० मिमी
शिंदे - ५६.०४ मिमी
सातपूर ३१.०० मिमी
देवळाली ५५.०२ मिमी
माडसांगवी ५१.०१ मिमी
मखमलाबाद २९.०० मिमी

इगतपुरी तालुका
इगतपुरी - ८४.०० मिमी
घोटी बुद्रूक. - ७८.०० मिमी
धारगाव - ६५.०० मिमी
वाडीवऱ्हे २९.४० मिमी
नांदगाव बुद्रूक ६०.०० मिमी
टाकेद बुद्रूक.- ५८.०० मिमी


मालेगाव तालुका
मालेगांव- ३४.००मी.मी.
दाभाडी- ४०.०० मी.मी.
अजंग -. ४०.०० मी.मी.
वडनेर- ४०.०० मी.मी.
करजगव्हण- २६.०० मी.मी.
डोंगराळे- १८.०० मी.मी.
झोडगे- ३६.०० मी.मी.
कळवाडी- १७.०० मी.मी.
कौळाने नि - ३४.०० मी.मी.
जळगांव नि.- २०.०० मी.मी.
सौदाने- ४७.०० मी.मी.
सायने - २४.०० मी.मी.
निमगाव - १२.०० मी.मी.


सुरगाणा तालुका
उंबरठाण - ५२.२ मी.मी.
बा-हे - ४२.५ मी.मी.
बोरगाव - ६८.० मी.मी
मनखेड - ४८.२ मी.मी.
सुरगाणा - ६३.२ मी.मी.
एकूण - २७४.१ मी.मी.


बागलाण तालुका
सटाणा - १५.१० मिमी
ब्राह्मणगाव . १६.०० मिमी
विरगाव -५५.००मिमी,
नामपूर -२६.०० मिमी
मुल्हेर -२१.००मिमी
ताहाराबाद -१६.०० मिमी
डांगसौंदाणे -३७.०० मिमी
जायखेडा -३८.०० मिमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT