Water pipelines damaged in gas pipeline work.
Water pipelines damaged in gas pipeline work.  esakal
नाशिक

Nashik News : खोदकामामुळे विजेची उपकरणे नादुरुस्त; वीजपुरवठा बाधित

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एमएनजीएल (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड) तर्फे पाथर्डी फाटा भागात सुरू असलेल्या खोदकामात वीज, पाणी आणि ड्रेनेजलाइन तोडून ठेवल्याने अनेकांची विजेची उपकरणे खराब झाली असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Due to gas pipeline digging work electrical equipment malfunction drainage line power supply disrupted nashik news)

सर्व्हे क्रमांक ३१४ येथील दामोदर नगरमधील पांडुरंग चौकात असलेल्या स्वामिनारायण हाईटस समोर चार- पाच दिवसांपूर्वी गॅस पाइपलाइनसाठी पूर्ण पार्किंगचा रस्ता व पूर्ण भागात खोदकाम केले गेले. त्या खोदकामांमध्ये या इमारतीच्या महावितरणची इलेक्ट्रिसिटी लाईन आणि ड्रेनेजलाइन तुटली.

रहिवाशांनी संबंधित सुपरवायझरच्या ही बाब लक्षात आणून दिली. मात्र, त्याची दुरुस्ती न करता आहे त्या स्थितीत माती लोटून या लाईन बुजविण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी इमारतीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे टीव्ही, फ्रिज, फोन, होम थिएटर, सेटअप बॉक्स नादुरुस्त झाले, तर दोन घरांची पूर्ण वायरिंग जळाल्याने नादुरुस्त झाली आहे.

एमएनजीएल कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली असता, त्यांनी हे सर्व पाहिल्यावर सरळ हात वर केले. त्यांना विनवण्या करून परत ती लाईन त्यांना खोदण्यास सांगितले त्यावेळेस महावितरणची इलेक्ट्रिसिटी वायर तुटलेल्या आणि कट जळालेल्या स्थितीत निघाली. त्या वायरला फावडे आणि टिकावचे घाव लागल्याचे स्पष्ट दिसत होते, असे रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कर्मचाऱ्यांनी सहकार्य न करता या फोन उचलणे बंद केले असून, पार्किंग समोरच खोदकाम केल्याने दुचाकी, कार, मुलांच्या सायकलीदेखील बेवारस स्थितीत रस्त्यावर उभे करण्याची वेळ आली असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. खोदकामात ड्रेनेजचे मोठा पाइपदेखील फुटल्याने पूर्ण परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे.

सहा दिवसापासून बिल्डिंगचे आणि प्रत्येक सभासदांच्या घरात झालेले नुकसानीमुळे सर्व सदस्य कंपनीकडे दाद मागत आहेत. मात्र कुणीही दखल घेत नसल्याने ही सर्व चौदा कुटुंबे संतप्त झाली आहेत.

मनपा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या ठेकेदारांना सूचना देऊन झालेल्या सगळ्या नुकसानीची दुरुस्ती करून देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रदीप जोशी, गुंजाळ, अजित शर्मा, विनायक कांगणे, अविनाश सोमवंशी, चंद्रकांत धायगुडे, संतोष गोवर्धने, किरण सोनवणे, विलास वाघमारे, मधुकर देवरे, महेश आवारी, दीपक पाटील, नरेंद्र महाले, अशोक साळवे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोनात आई गेली...आता होर्डिंग दुर्घटनेमध्ये २१ वर्षीय कमावता भरत गेला, राठोड कुटुंबावर काळाचा घाला

Marathi News Live Update: ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT