Manikrao Kokate : ‘कडवा’तील दोष तातडीने दूर करा : माणिकराव कोकाटे

Speaking at the review meeting, MLA Manikrao Kokate.
Speaking at the review meeting, MLA Manikrao Kokate. esakal

Nashik News : शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा होण्यासाठी कडवा योजनेची निर्मिती करण्यात आली होती. योजना सुरु होऊन चार-पाच वर्षे झाली असून दोन्ही योजना सुरु असताना अद्याप नागरिकांना दररोज पाणीपुरवठा होऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. (Manikrao Kokate statement about Kadwa 24 7 water supply scheme nashik news)

कडवा योजनेतील दोष दूर करून आठ दिवसांत प्रतिव्यक्ती दररोज शंभर लिटर पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

येथील नगरपरिषदेच्या सभागृहात पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषदेच्या प्रशासक हेमांगी पाटील, मुख्याधिकारी रितेश बैरागी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आमदार कोकाटेंकडे आल्याने त्यावर उपाययोजनेसाठी बैठक घेण्यात आली. सद्यःस्थितीत शहराला दीड लाखांची गरज असून नगरपरिषदेच्या कडवा पाणी योजनेसाठी पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने योजनेद्वारे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Speaking at the review meeting, MLA Manikrao Kokate.
Water Crisis: आदिवासी भागात पाण्यासाठी महिलांची पायपीट; इगतपुरी तालुक्यातील वाड्यापाड्यांवर मे महिन्यातच झळा!

खंडित वीजपुरवठ्यामुळे केवळ ९० ते १ कोटी १० लाख लिटर पाणी उपलब्ध होत असल्याचे पाणीपुरवठा अधिकारी हेमलता दसरे यांनी सांगितले. त्यावर भरवीर फिडर, शेणित फिडर व दोन एक्स्प्रेस फिडरवरून पुरेसा वीजपुरवठा करण्याच्या सूचना आमदार कोकाटे यांनी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

पाच वर्षांपूर्वी दारणा योजनेतून शहरासाठी ५५ लाख लिटर पाणी उचलले जात असताना नागरिकांना दीड दिवसांनी सुरळीत पाणीपुरवठा होत होता. मात्र, आता दीड कोटी लिटर पाणी उचलूनही चार-पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याकडे माजी नगरसेवक मेहमूद दारूवाला यांनी लक्ष वेधले. नाशिक-पुणे महामार्गालगत योजनेच्या मुख्य लाईनवरून अनेकांना अवैध कनेक्शन देण्यात आले असून त्याचीही पडताळणी करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

शहरातील स्वच्छता, औषध फवारणी होत नसल्याच्याही तक्रारी पदाधिकाऱ्यांनी केल्या. त्यावर येत्या आठ दिवसांत योजनेच्या सर्व समस्या सोडवून याबाबतचा अहवाल तयार करण्याच्या सूचनाही आमदार कोकाटे यांनी दिल्या. माजी नगरसेवक, अधिकारी, सेवकवर्ग उपस्थित होता.

Speaking at the review meeting, MLA Manikrao Kokate.
Nashik Water Scarcity : येवल्यात टंचाईची दाहकता वाढली; संपूर्ण दिवस जातो पाण्याच्या शोधात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com