नाशिक

Nashik News : पिंपळगाव बसवंत बाजारपेठेत खरेदीची धूम; लग्न खरेदीमुळे व्यावसायिकांमध्ये चैतन्य

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लग्नसराईनिमित्त पिंपळगाव बसवंत बाजारपेठेत खरेदीची धूम बघायला मिळत आहे. कपडे खरेदीसह दागिने, संसारोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अन्य खरेदीचा जोर सुरू आहे. (due to wedding season Pimpalgaon Baswant Market is witnessing shopping spree nashik news)

त्यामुळे व्यावसायिकांमध्ये चैतन्य संचारले आहे. सध्या लग्नाचा हंगाम सुरू झाल्याने बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. द्राक्षनगरीच्या बाजारपेठेत ‘लगीनघाई’ दिसत आहे.

दोन वर्षात कोरोना महामारीत लग्न समारंभावर मर्यादा आल्या होत्या. परंतु, आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने अनेकांकडून धुमधडाक्यात लग्नाचा बार उडविला जात आहे. जुलैपर्यंत चालणाऱ्या लग्नसराईसाठी खरेदीची लगबग सुरू आहे. यात प्रामुख्याने लग्नाचा बस्ता कपड्यांची खरेदी, दागिने व संसारोपयोगी वस्तूंची खरेदी केली जाते आहे.

यामुळे भर उन्हाळ्यातदेखील बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ बघायला मिळते आहे. यंदा विक्रमी लग्न सोहळे होणार असल्याने चांगला व्यवसाय होण्याचा व्यावसायिकांचा अंदाज आहे. कुटुंबांमधील सदस्यांच्या लग्नासाठी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कपडे खरेदीचा जोर सध्या सुरू आहे.

काहींकडून रेडिमेड, तर काहींकडून कपड्यांना प्राधान्य दिले जाते आहे. त्यामुळे शिवणकाम करणाऱ्या व्यावसायिकांकडेही गर्दी बघायला मिळत आहे. कुटुंबासाठी कपड्यांचे पॅकेज काही व्यावसायिकांकडून उपलब्ध करून दिलेले आहे. सोन्याला झळाळी प्राप्त झाली असून सातत्याने वाढत्या सोन्याच्या दराकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी

नवदांपत्याला भेट म्हणून उन्हाळ्यात फ्रिज, एसी, कुलर व अशा विविध वस्तूंची खरेदी यानिमित्त केली जात आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी वाढलेली आहे.

"गेल्या दोन वर्षांपासून मागणी पूर्णपणे ठप्प झालेली होती. या वर्षी आशादायी चित्र आहे. ग्राहकांचा प्रतिसाद येत्या काही दिवसांत कपडे खरेदीसाठी वाढेल असा अंदाज आहे." -अमित संकलेचा अमित साडी, पिंपळगाव बसवंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT