Unseasonal Rain crop damage farmer
Unseasonal Rain crop damage farmer sakal
नाशिक

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे कसमादेत चाराटंचाई! कडबा खराब अन् दुग्ध व्यावसायिकांच्या चिंतेत भर

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain : कसमादे पट्ट्यामध्ये अवकाळी पावसाने कहर केला. त्यामुळे काटवन, नामपूर परिसर व मोसम खोऱ्यात बाजरीचा चारा काळा पडला. बाजरीचा चारा माती लागून अर्धा जागेवरच सडला. काड्या गोळा करून तोही काळा पडला.

मक्याचा कडबा चारा म्हणून उपयोगात येईल पण तोही काळा व वाकडा होऊन जमिनीला लटकल्यामुळे काळा पडला. हा चारा काही कामात येणार नाही.

पशुधन हा चारा खात नसल्यामुळे जनावरांना चारा आणायचा कुठून या विवंचनेत शेतकरी आहे. अवकाळी पावसामुळे यावर्षी काटवन-मोसम खोऱ्यात यंदा चारा टंचाई भासणार आहे. (due unseasonal rain shortage of cattle food in Kasmade adding to worries of dairymen nashk news)

मोसम खोऱ्यात पशुधन मोठ्या संख्येने आहे. ज्यांचा दूग्ध व्यवसाय आहे तेही चिंतेत पडले आहेत. आत्तापासूनच चाऱ्याचा शोध घेण्याची लढाई शेतकऱ्यांना करावी लागत आहे. चाऱ्याची यंदा मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवणार आहे.

कसमादे पट्टा हा कांद्याचे आगर म्हणून ओळखला जातो. अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांवर आधीच संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा पातेचे देखील नुकसान झाले आहे. उष्णतेमुळे चाळीमधून कांदा सुद्धा बाहेर काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जनावरांना शेतात खाण्यासाठी चारा नाही. पावसामुळे पूर्ण कडबा खराब झाला. कडबा, बाजरी, सरमट गव्हाचा भुसा, कुटार एकत्र करून पावसाळ्यामध्ये जनावरांना खाण्यासाठी उपयोगी पडते. पण यावर्षी ते सुद्धा गव्हाचा भुसा बाजरीचे काड्या या सुद्धा खराब झाल्या असून पावसाळ्यात जनावरांना कुठून चारा द्यायचा.

त्याचप्रमाणे कुटार व पाला एकत्र करून एक प्रकारे खुराक म्हणून वापरतात तोही खराब झाला आहे. चारा टंचाईमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. महागाईमुळे विकतचा चारा परवडत नाही. त्यामुळे शेतकरी पूर्णतः हैराण झाला आहे.

"उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने हिरवा चारा महाग मिळत आहे. पावसामुळे बाकी पिकाचा चारा सडून गेला आहे. दुभती जनावरांना कसाबसा चारा व ढेफ घालून दूध काढतो पण दूध कमी मिळत आहे." - दिनेश रौंदळ (दूध उत्पादक शेतकरी, बिजोरसे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT