Pre Monsoon Rain: मालेगावला मृगाच्या सरी कोसळल्या; 20 मिनिटांच्या पावसाने सखल भागात पाण्याचे तळे! | Pre Monsoon Rain in Malegaon 20 minutes of rain in low lying areas nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Parishad School in Malegaon and some water suddenly entered the city.

Pre Monsoon Rain: मालेगावला मृगाच्या सरी कोसळल्या; 20 मिनिटांच्या पावसाने सखल भागात पाण्याचे तळे!

Pre Monsoon Rain : शहर व परिसरात आज सायंकाळी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वादळी वाऱ्यासह सुमारे २० मिनिटे मृगाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे सायंकाळी कामावरुन परतणाऱ्या व रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या तसेच बाजारपेठेतील नागरिकांची मात्र धावपळ उडाली.

सटाणा नाका भागातील शिवम हॉटेलजवळ पत्रा लागून एक जण किरकोळ जखमी झाला. दरेगाव भागात पावसामुळे नाल्यांना पाणी आले. पहिल्याच पावसात शहरातील विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला. (Pre Monsoon Rain in Malegaon 20 minutes of rain in low lying areas nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहर व परिसरात अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने दाणादाण उडाली. तर अचानक नगर परिसरातील झोपडपट्टीतील अनेक घरांचे पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले. शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

पावसामुळे तीन तास शहराचा वीज पुरवठा खंडित होता. येथील पवारवाडी, शाह प्लॉट, दरेगाव भागातील सय्यद पार्क यासह भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य झाले.

पावसामुळे जिल्हा परिषद शाळा व अचानक नगर परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले. हे पाणी वाहून जाण्यासाठी काही ठिकाणी भिंत तोडावी लागली.