e-auction of vehicles esakal
नाशिक

थकीत कर असलेल्या वाहनांचा ई-लिलाव

कुणाल संत

नाशिक : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा ७ जूनला सकाळी ११ वाजता जाहीर ई- लिलाव होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी दिली. ६ जूनपर्यंत थकीत कर असलेल्या वाहन मालकांनी कर भरावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा ७ जूनला लिलाव होणार आहे. यामध्ये बस, ट्रक, टॅक्सी, हलकी मालवाहू वाहने व रिक्षा असे ४२ वाहने आहे. वाहने जशी आहेत तशी, या तत्त्वावर जाहीर ई- लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.

ई- लिलावात सहभागी होण्यासाठी ३१ मे ते ५ जून कालावधीत सकाळी अकरा ते सायंकाळी सहापर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे ६२ हजार २०० रुपये रक्कमेचा ‘आरटीओ नाशिक’ नावाने डिमांड ड्राफ्ट पत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

लिलाव प्रक्रियेत उपलब्ध जीएसटी धारकांनाच सहभाग घेता येणार आहे. लिलाव करण्यात येणारी वाहने नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक पेठ रोड येथील राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा, सिन्नर बसडेपो व बस स्टॅन्ड, बोरगाव सीमा तपासणी नाका, येवला बस डेपो, पिंपळगाव बसवंत बस डेपो येथे पाहणीसाठी उपलब्ध असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I: भारत - ऑस्ट्रेलिया वनडे मालिका संपली आता सुरू होणार टी२० मालिकेचा थरार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

'12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला...' सतीश शाह यांचा निधनापूर्वी केलेला सचिन पिळगांवकरांना मॅसेज, म्हणाले...'सतीश आणि मी... '

Latest Marathi News Live Update : 'हे लोक आधीच जनतेला गोंधळात टाकत आहेत...'-मनोज तिवारी

Accident News : दुर्दैवी अपघात! गिरनारला देवदर्शनासाठी जात असताना बडोद्यात सांगलीच्या दोघांचा जागीच मृत्यू

पक्ष भाजपमध्ये विलीन करा, मोदी-शहांनी शिंदेंना आदेश दिल्याचा राऊतांचा दावा; दिल्ली दौऱ्यावरून टीका

SCROLL FOR NEXT