NSK26H35081
ओढा ः येथील शेतात जावून ई-पीक पाहणी करताना तलाठी दीपक मोठे व शेतकरी.
…---------
ई – पीक पाहणीसाठी उरले अवघे १५ दिवस
तलाठी शेतकऱ्यांच्या बांधावर, अचूक पीक पाहणी होण्यासाठी पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१५ : शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असल्याने त्यासाठी उताऱ्यावर ई- पीक पाहणी असणे आवश्यक आहे. इ पीक पाहणीस शासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उताऱ्यावर पीक पेरा असल्यास मदत मिळणे अधिक सोपे होते. मोबाईल अपद्वारे ई–पीक पाहणी करताना राज्यातील विविध भागामध्ये तांत्रिक अडचणी, जियो- लोकेशनमधील त्रुटी, गावाच्या नकाशामधील तफावत तसेच काही गट क्रमांक उपलब्ध नसणे, डोंगराळ दुर्घम भागात नेटवर्क नसणे अशा अडचणी निर्माण झाल्याने ई-पीक पाहणी अद्याप पूर्ण झालेली नाही. ऑफलाईन ई-पीक नोंदणी क्षेत्रीय स्तरावर ई- पीक पाहणीसाठी ३० नोव्हेंबर त्याचबरोबर शेतकरी आणि पीक पाहणी स्तरावर देखील तेवढिच मुदतवाढ दिली आहे. ज्यांची खरिपातील पीक पाहणी करणे बाकी अथवा काही अडचणी असल्यास त्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल विभागामार्फत केले जात आहे.
…
१६-१
गावचे तलाठी बांधावर
जिल्हातील एकूण १५ तालुक्यापैकी दिंडोरी आणि नाशिक फक्त हे दोन तालुके वगळता उर्वरित १३ ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केलेले आहेत. ग्राम महसूल अधिकारी ओढा आणि शिलापूर क्षेत्रीय अधिकारी स्व:ता लॅपटॉप हाती घेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात ई–पीक पाहणी करीत आहेत.तलाठी शेतात जाऊन पिकांची अचूक नोंद करीत असल्याने अचून नोंदी होत आहेत.
…
कोट
गावचे तलाठी यांची कामाची पद्धत अतिशय जलद आहे. शेतकरी त्यांच्याकडे काम घेवून गेल्यास त्यांचे काम होते. ई-पीक पाहणीत शेतकर्यांना अनुभव अगदी तसाच राहिला आहे. ज्या शेतकर्यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही त्यांनी येत्या १५ दिवसांच्या आत करुन घ्यायला हवी.
- गजानन भोर, पोलिस पाटील ओढा, शिलापूर