bribe esakal
नाशिक

नाशिक : शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ

विनोद बेदरकर

नाशिक : लाचप्रकरणात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर- झनकर यांना न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे शिक्षकांना नियमित वेतन सुरू करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ लाखांची लाच घेताना सापळा लावून पकडले होते.

शुक्रवारी (ता. १३) त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी (ता. १४) पुन्हा न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या वेळी सरकारी वकील सचिन मोराडकर यांनी डॉ. वीर- झनकर यांच्या आवाजाच्या नमुन्याची तपासणी, घरझडतीत सापडलेल्या गोष्टींची शहानिशा करण्यासाठी पोलिस कोठडी मागितली. दरम्यान, याच प्रकरणी अटकेत असलेल्या चालक ज्ञानेश्‍वर येवले व शिक्षक पंकज दशपुते यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

निलंबनाचा मंगळवारी फैसला शक्‍य

दरम्यान, या प्रकरणात संशयित वाहनचालक ज्ञानेश्‍वर येवले यास यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. त्‍यापाठोपाठ शनिवारी संशयित शिक्षक पंकज दशपुते यास जिल्‍हा परिषदेच्‍या सीईओंनी निलंबित केले. या दोन्‍ही कारवाया स्‍थानिक पातळीवर झाल्‍या. मात्र, शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवरून निलंबनाची कारवाई होणार आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत प्रस्‍तावही पाठविण्यात आला आहे. ४८ तासांहून अधिक कालावधीसाठी पोलिस कोठडीत असल्‍याने झनकरांचे निलंबन अटळ आहे. मात्र, रविवारी (ता. १५) स्‍वातंत्र्यदिन व रविवार आणि सोमवारी (ता. १६) पतेतीनिमित्त शासकीय सुटी आहे. त्‍यामुळे मंगळवारी (ता. १७) निलंबनाचे आदेश जारी होण्याची शक्‍यता आहे. दरम्‍यान, या कारवाईनंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार अद्याप अन्‍य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेला नाही. अशात निलंबनाच्‍या आदेशासोबत प्रभावी कार्यभार असलेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव जाहीर केले जाण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Pawna Dam News : पवना धरण परिसरातील अतिक्रमणावर पाटबंधारे विभागाची जोरदार कारवाई!

Pune Municipal Election : मतदारांच्या पळवापळवीने इच्छुकांचे धाबे दणाणले

Ambegaon News : २५०० पशुधनावर एकच दवाखाना; एक्स-रे, सोनोग्राफीसह अत्याधुनिक सुविधा देणारे ‘तालुका सर्वचिकित्सालय’ रखडले!

SCROLL FOR NEXT