ॲंकर
NSK26H34932
जळगाव : शालेय राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंसह प्रशिक्षक.
----
राज्य स्क्वॉश स्पर्धेसाठी ‘एकलव्य’चे २१ खेळाडू पात्र
विभागीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी; पुण्यात रंगणार राज्यस्तरीय स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : शालेय विभागस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुल संचलित एकलव्य स्क्वॉश ॲकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाच्या जोरावर ॲकॅडमीच्या २१ खेळाडूंची उंड्री (पुणे) येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटांचा समावेश आहे. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात वरुनिका बोडके हिने प्रथम, रुहिका पाटील हिने द्वितीय, श्रेयसी हिंगणकर हिने चौथा, तर जिनल अग्रवाल हिने पाचवा क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात इशा देशपांडे हिने प्रथम, पालवी मांडे हिने चौथा, तर पलक चौधरी हिने पाचवा क्रमांक पटकाविला. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात हर्षित पाटील हिने प्रथम, अर्पिता कदम हिने तृतीय, तर अनौष्का वाणी हिने पाचवा क्रमांक मिळविला.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धार्थ शर्मा प्रथम, पार्थ विसपुते द्वितीय, अर्णव दांडगे तृतीय, पार्थ दंडगव्हाळ चौथा आणि परम पाटील पाचव्या क्रमांकावर राहिला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात यश हेमलाणी याने प्रथम, उत्कर्ष वाघ याने तृतीय, भैरव महाजन याने चौथा, तर वेद पाटील याने पाचवा क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धेश खांड्रे याने प्रथम, तर आरुष चौधरी याने द्वितीय क्रमांक पटकाविला. या सर्व खेळाडूंना स्क्वॉश विभागाचे मुख्य प्रशिक्षक प्रा. प्रणव बेलोरकर आणि शुभम शिसोदे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, एकलव्य स्केटिंग ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक डॉ. रणजीत पाटील तसेच खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.