Court Order esakal
नाशिक

Electricity Companies Strike : वीज संपामुळे जमावबंदी आदेश

अंबादास शिंदे

नाशिक रोड : सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ यांनी वीज कंपनीच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात कर्मचा-यांची संयुक्त कृती समिती, राज्य वीज कर्मचारी अधिकारी व अभियंता संघर्ष समिती तसेच राज्य वीज कर्मचारी अधिकारी या तीन संघटनांनी ४ जानेवारी ते ६ जानेवारी असा ७२ तासांचा राज्यव्यापी पुकारेलाल संप लक्षात घेऊन एकलहरे आस्थापनेच्या आवारात व्दारसभा, धरणे आंदोलन, रास्ता रोको, निदर्शने करण्यास मनाई आदेश जारी केला आहे. (Electricity Companies Strike Prohibition order due to electricity strike nashik news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

धुमाळ यांच्या मनाई आदेशाचा आशय असा की, गेल्या वर्षी मार्चमध्येही दोन दिवस संप पुकारण्यात आला होता. त्यावेळी कामगार व युनियन पदाधिका-यांनी एकलहरे औष्णिक वीज केंद्रातील फिडर बंद केले होते. त्यावेळी वीज केंद्रात तांत्रिक बिघाड झाला होता. आता होणा-या संपात असा प्रकार घडल्यास वीज संच बंद पडून वीज पुरवठा खंडीत होईल.

या संप कालावधीत कोणताही संघर्ष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील तिन्ही संघटनांना एकलहरे आस्थापनेच्या आवारात व दोनशे मीटर परिघात व्दारसभा, धरणे आंदोलन, रास्ता रोको, निदर्शने करण्यास मनाई करण्यात येत आहे.

संपकऱ्यांनी कामावर जाणा-या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसेच वाहनांना प्रतिबंध करू नयेत. वरील परिसरात लाठ्याकाठ्या, शस्त्रे, अग्नीशस्त्रे, ज्वलनशील पदार्थ, असीड, घातकशस्त्रे आदी घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT