Crime
Crime esakal
नाशिक

Nashik Crime : हॉकर्स झोन आखणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : भद्रकाली तलावाडी येथे महापालिकेकडून सेंट्रल मार्केटचे निर्माण करण्यात येत आहे. त्या ठिकाणी हॉकर्स झोन तयार करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले जात आहे.

गुरुवारी (ता. १) सकाळी हॉकर्स झोन आखणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना अतिक्रमणधारकांकडून धक्काबुक्की करत काम बंद पाडले. (employees who came to plan hawkers zone beaten Nashik Crime news)

गुरुवारी सकाळी महापालिकेचे कर्मचारी सेंट्रल मार्केटमध्ये ठरविलेल्या हॉकर्स झोनची आखणी करण्यासाठी आले होते. काही प्रमाणात आखणी झाल्यानंतर येथील अनधिकृत व्यावसायिकांनी आखणीस मज्जाव केला. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत काम बंद पाडले.

यामुळे कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे हॉकर्स झोनची आखणी अर्धवट झाली आहे. आखणी पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम महापालिका अतिक्रमण विभागाकडून येथील अनधिकृत अतिक्रमण काढणे आवश्यक असल्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या ठिकाणी काहींनी अनधिकृतरीत्या अतिक्रमण केले आहे. त्यात मद्य विक्रीसह, भांग, गांजा असे विविध प्रकारचे अमलीपदार्थांची विक्री होते. गुन्हेगारी प्रवृत्तीचे तसेच येथील दुकानांवर अमलीपदार्थ खरेदी करून सेवन करत असतात.

त्यातूनच परिसरात लूट, मारहाणीच्या घटना घडत असतात. महापालिकेकडून येथे हॉकर्स झोनची आखणी करत असताना प्रथम अशा प्रकारचे अनधिकृत अतिक्रमण काढण्याची कारवाई करणे आवश्यक आहे. जेणेकरून हॉकर्स झोन निर्माण करताना अडचणी येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : जिरेटोपावरुन प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट मनात...

RR vs PBKS : राजस्थान आज प्ले ऑफमध्ये जाणार की पंजाब देणार पराभवाचा धक्का... प्रीती झिंटाच्या संघाचा कर्णधार कोण?

"आपल्या जीवाची या देशात किंमत नाही" ; घाटकोपर दुर्घटनेनंतर अभिनेत्याने व्यक्त केला संताप !

Latest Marathi News Live Update : राजस्थान खाणीत १४ पैकी १० जणांना बाहेर काढण्यात यश

Nagpur News : रेल्वेच्या जागेवरील सर्व होर्डिंग अनधिकृत! ; तपासणी होणार,उद्यापासून फलकांचे सर्वे सुरू

SCROLL FOR NEXT