नाशिक

गजपती युवा मंच ट्रस्ट तर्फे आदिवासी विद्यार्थ्यां सोबत दिवाळी साजरी.

CD
SUG26B03166 खुंटविहीर ः येथे शालेय विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व फराळाचे वाटप करताना आदिवासी विद्यार्थ्यांसह नाशिक येथील गजपती युवा मंच ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी. ------------------- ३६-३ कष्टकरी पालकांच्या मुलांसोबत दिवाळी गजपती युवा मंच ट्रस्टतर्फे आदिवासी भागात शैक्षणिक साहित्य, फराळवाटप सकाळ वृत्तसेवा सुरगाणा, ता. १३ ः अतिदुर्गम आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे हे शिक्षकांच्या हाती असते. पुस्तकी शिक्षणाबरोबरच समाजात वावरण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे असे आवाहन गजपती युवा मंच ट्रस्टचे (नाशिक) अध्यक्ष गणेश बोरसे यांनी खुटंविहीर येथे केले. आदिवासी भागातील दोनशे पाड्यावरील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व दिवाळी फराळ वाटपाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पोलिस पाटील यादव झिरवाळ, रतन चौधरी, ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रीतम भामरे, सहाय्यक लेखाधिकारी किरण माळवे ट्रस्टचे सदस्य अथर्व महाले, शशिकांत आहेर, सूरज डंबाळे, यश टिळे, रोहित घायवाटे, राज वैरागे, यश हार्डे, अभिषेक शिंदे, कुणाल त्रिभुवन, ओम पंडुरे, साहिल आगळे, नितीन रायते, चिन्मय माळवे आदी उपस्थित होते. श्री. बोरसे म्हणाले,‘ आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये हुशारी, जिद्द, चिकाटी, कौशल्य मोठ्या प्रमाणात असते, शिक्षकांनी त्यांना शहरी भागात सहज वावरता, बोलता आले पाहिजे यासाठी प्रशिक्षित करायला हवे. योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले भविष्य घडवतील अशी आशा व्यक्त केली. उपाध्याध प्रीतम भामरे यांनीही मनोगत व्यक्त केले मोहपाडा, खुंटविहीर, उलालदरी, उंबरघोडा, उंबरपाडा, झिरणीपाडा, गाळबारी या पाड्यावरील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले. गरजूंना कपड्याचे वाटप करण्यात आले. खुटंविहीर येथे सांस्कृतिक हाॅलमध्ये फॅन बसविणे, तातापाणी उंबरपाडा येथे दोन हजार लिटरची पाण्याची टाकी भेट देणार असल्याचे गणेश बोरसे यांनी जाहीर केले. हस्तकलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी यांनी तयार केलेले आदिवासी बोहाडा कलाकृती, संस्कृती, सोंगी मुखवटे पाहून त्यांनी कौतुक केले. शिक्षक लक्ष्मण चौधरी, सीताराम राठोड, विठ्ठल वाघमारे, चिंतामण चौधरी, विद्या राऊत, किशोर गावित, खुशाल राऊत, अशोक जाधव, जयराम जाधव, सोनीराम राऊत, कमलेश गायकवाड आदी उपस्थित होते. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: “आम्ही सहज जिंकू असं वाटलेलं, पण…”, भारताच्या २४४ धावांच्या लाजीरवाण्या पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर काय म्हणाला?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचं नाव मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Neha Bora: नेहा बोरा म्हणतात 'मी स्त्री नाही अन् पुरुषही नाही'! नॉन-बायनरी म्हणजे नक्की काय?

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : खारघरमध्ये लिफ्टच्या दरवाजात अडकून मांजरीचा दुर्दैवी मृत्यू; महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

SCROLL FOR NEXT