Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: ॲप्लिकेशन पाठवून बँक खातेच केले रिकामे! सायबर भामट्याने 5 लाख घेतले काढून

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिओ कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून सायबर भामट्याने मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून फिर्यादी महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ३५ हजारांची रक्कम काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Empty bank account by sending application 5 lakhs taken by cyber scammers Nashik Cyber ​​Crime)

मोहिनी शामलाल नरियानी (६६, रा. गायके कॉलनी, धोंगडेनगर, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या १८ नोव्हेंबर रोजी अज्ञात संशयिताने त्यांच्या मोबाईलवर फोन केला आणि जिओ कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले.

त्यावेळी संशयिताने मोहिनी यांना त्यांच्या मोबाईलच्या व्हॉटसॲपवर एक ॲप्लिकेशन पाठविले आणि ते त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मोहिनी यांनी ते ॲप्लिकेशन व्हॉटसॲपवरून डाऊनलोड केले.

मात्र संशयित सायबर भामट्याने त्यानंतर त्यांच्या मोबाईल हॅक करून घेत त्यांच्या बँक खात्यातील ५ लाख ३५ हजार ७०० रुपयांची रक्कम ऑनलाईन वर्ग करून घेत त्यांची फसवणूक केली.

सदरचा प्रकार दुपारी पावणे बारा ते पावणे दोन या वेळेत झाला. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ठाकरेंचं चॅलेंज फडणवीसांनी स्वीकारलं; म्हणाले, एक लाख रुपये जिंकलो!

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे, दौड, काष्टी रुळाचे काम होणार; नागपूर-पुणे मार्गावरील गाड्या झाल्या रद्द..

Nashik Grapes Export : नाशिकच्या द्राक्षांचा परदेशात डंका! नेदरलँड अन् जर्मनीसाठी पहिली ३० टनांची खेप रवाना

Chhatrapati Sambhajinagar News : शहर पर्यटन वाढीला आडकाठी! नियोजित पर्यटन धोरण वर्षभरापासून रखडले

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

SCROLL FOR NEXT