Sudhakar Badgujar felicitating MLA Seema Here. Neighbors Amol Jadhav, Sangeeta Jadhav, Balkrishna Shirsat etc.
Sudhakar Badgujar felicitating MLA Seema Here. Neighbors Amol Jadhav, Sangeeta Jadhav, Balkrishna Shirsat etc. esakal
नाशिक

Nashik Political : सेनेच्या कार्यक्रमात BJP आमदाराची Entry

राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (जि. नाशिक) : मंगळवारी (ता. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास वासननगर येथील गामणे मैदानावर भरवण्यात आलेल्या शिवसेनाप्रणित सह्याद्री युवक मंडळ आणि शिवमुद्रा फाउंडेशनच्या दांडिया मैदानात आमदार सीमा हिरे यांची एन्ट्री झाल्याने काही काळ संयोजकदेखील गडबडून गेले होते. विशेष म्हणजे या वेळी आमदार हिरे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हेदेखील व्यासपीठावर होते. संयोजक तथा माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी अखेर समयसूचकता दाखवत बडगुजर यांच्या हस्तेच आमदार हिरे यांचे स्वागत करून वातावरण हलकेफुलके केले. (Entry of BJP MLA seema hire in shivSena program in city nashik Latest Political News)

शेवटचा दिवस असल्याने येथे अफाट गर्दी झाली होती. श्री. जाधव हे बडगुजर यांचे स्वागत करताना यापुढे या भागात जर मोठे प्रकल्प आणायचे असतील तर आमदार म्हणून बडगुजर यांच्यासारखे नेतृत्व सर्वांनी पुढे आणण्यासाठी चंग बांधला पाहिजे, असे आवाहन केले. नेमक्या त्याच वेळी आमदार हिरे यांचे येथे आगमन झाले. शिवसेनेच्या स्टेजवर भाजपच्या आमदार आल्याने उपस्थित हजारो दांडियाप्रेमीदेखील काही क्षण अवाक झाले.

आमदार हिरे आणि जाधव हे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे जाधव यांचे चिरंजीव अमेय यांनी आमदार हिरे यांना विशेष आमंत्रण दिले होते. मतदारसंघातील कार्यक्रम आणि मिळालेल्या आमंत्रणाचा मान ठेवून हिरे येथे आल्या खऱ्या, मात्र सर्वांचीच काही क्षण गोची झाली. पोलिसदेखील सतर्क झाले. अखेर आपला राजकारणातला अनुभव पणाला लावून श्री. जाधव यांनी माईकचा ताबा घेत आमदार हिरे यांनीच आता त्यांच्यासह बडगुजर यांच्याही आमदारकीबाबत काही तरी करावे, असे आवाहन केले आणि वातावरण हलके केले.

बडगुजर यांनाच मग त्यांनी आमदार हिरे यांचे स्वागत करण्यास सांगितले. त्यांनीदेखील हसत मुखाने स्वागत करत आनंदात भर टाकली. त्याला उपस्थितांनीदेखील टाळ्या वाजवत मोठी दाद दिली, तर आमदार हिरे यांनीदेखील नागरिकांच्या आनंदासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाचे मोठ्या मनाने कौतुक केल्याने त्यांनादेखील उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्यांची दाद दिली.

दांडिया निमित्त महायुती

हे सगळे होत असताना उत्कृष्ट सादरीकरणासाठी बक्षीस मिळवणाऱ्यात शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या सूनबाईंचा समावेश असल्याचे समोर आल्याने दांडिया निमित्त का असेना शिवसेना, भाजप आणि शिंदे गट अशी महायुती झाली आहे. अशी मिस्कील प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. हे सर्व सुरू असताना मोठ्या तणावात आलेले इंदिरानगरचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे आणि सहकारी पोलिस तणावमुक्त झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT