Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News: दांडिया ऐच्छिक असतानाही जि. प. कर्मचाऱ्यांना सक्ती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आपल्या सण-उत्सवाची परंपरा जपावी व कामाच्या ताणतणावातून काही काळ मुक्तता मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी (ता. २५) दांडियाचे आयोजन केले होते. (Even though Dandiya optional ZP force employees Nashik News)

या दांडिया उत्सवात सहभाग घेणे ऐच्छिक असल्याचे श्रीमती मित्तल यांनी जाहीर केलेले असतानाही कर्मचाऱ्यांना दांडिया खेळण्यासाठी विभागातील काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून सक्ती झाल्याची चर्चा आहे.

वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी सक्तीची वर्गणी वसूल केल्याने कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर उमटला. दांडियात सहभागी होणे ऐेच्छिक ठेवत २०० रुपये वर्गणी ठेवली होती. त्यासाठी कोणालाही सक्ती करू नये, अशा स्पष्ट सूचना श्रीमती मित्तल यांनी यंत्रणेला दिल्या होत्या.

सुरवातीला यास कर्मचारी वर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. नंतर मात्र अचानक या महोत्सवाची काही विभागातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून सक्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

विभागातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी यासाठी कर्मचाऱ्यांवर सक्ती करीत त्यांच्याकडून अतिरिक्त वर्गणीही वसूल केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू होती.

मात्र, प्रशासनाने अशी सक्तीची वसुली झाली नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, दांडिया महोत्सवात सुमारे ३५० हून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT