farmers-.jpg
farmers-.jpg 
नाशिक

शेतकऱ्यांनो! योजनेचा लाभ घ्या; महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणीसाठी मुदतवाढ

सकाळवृत्तसेवा

मालेगाव (नाशिक) : कृषी विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकत्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेत नोंदणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे.

लाभासाठी नोंदणी करण्याचे आवाहन 
 
महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadoimahat.gov.in हे संकेतस्थळ असून, या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक/ लॅपटॉप/ टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदी माध्यमातून वरील संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल, त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. 

अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया ऑनलाइन

नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाइन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी, तसेच निवड झालेल्या लाभाधारकांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. ज्या अर्जदारांनी यापूर्वी माहिती भरली असल्यास त्यांनी पुन्हा माहिती भरण्याची आवश्यकता नाही. लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात. मुदतीत आलेले सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT