धुळे ः टुडे १ साठी, जाहिरातीखाली
--
खेळाडू विद्यार्थी अतिरिक्त
गुणांची प्रक्रिया आता सुलभ
-
अर्जातील माहिती रकाने २२ वर
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ : दहावी आणि बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जातील माहितीचे रकाने २९ वरून २२, तर आवश्यक कागदपत्रांची संख्या आठवरून सात करण्यात आली आहे. या गुणांसाठी विद्यार्थ्यांना १ जानेवारी ते १ मार्च या कालावधीत ‘महावन’ संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
क्रीडा विभागाने ही सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत समाविष्ट केली आहे. ऑलिम्पिक महाराष्ट्र असोसिएशनसह विविध क्रीडा संघटनांनी सुचवलेल्या त्रुटी दूर करून प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय समितीच्या ८ सप्टेंबरला झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार योजनेत सुधारणा करण्यात आल्या. नव्या प्रक्रियेनुसार विद्यार्थ्यांना ‘महावन’ संकेतस्थळावर आधारकार्डच्या आधारे ‘महाआयडी’ तयार करणे अनिवार्य आहे. या आयडीमुळे विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाइल क्रमांक ही माहिती अर्जात आपोआप भरली जाणार आहे. उर्वरित प्रमाणपत्रे ‘डिजिलॉकर’द्वारे सादर करता येतील. ‘महाआयटी’मार्फत या प्रक्रियेसाठी सुधारित डिजिटल प्रणाली विकसित करून तिचे नियंत्रण केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.