Arrested
Arrested esakal
नाशिक

Nashik Crime: मालेगाव शहरातील सटाणा नाका भागातील बॅंक काॅलनीत सशस्त्र दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न; दोघांना अटक

प्रमोद सावंत

मालेगाव : शहरातील सटाणा नाका भागातील बॅंक काॅलनीत सशस्त्र दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. तीन सशस्त्र दरोडेखोरांनी इंदिरानक्षत्र या इमारतीत घुसून चाकू व बंदूकीचा धाक दाखवून जबरी लुट करण्याचा प्रयत्न केला.

हल्ला करून पलायन करणाऱ्या दोन हल्लेखोरांना परिसरातील तरूणांनी शिताफीने पाठलाग करत पकडले.

जमावाने दोघा हल्लेखोरांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी (ता. २९) रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. (failed armed robbery attempt at bank colony in Satana Naka area of ​​Malegaon city 2 arrested Nashik Crime)

सटाणा नाका भागातील सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या कल्याण कट्टा नजीक मंगलमूर्ती मेडिकल समोर राहूल देवरे यांच्या मालकीची इंदिरा नक्षत्र पार्क ही सोळा सदनिका असलेली इमारत आहे.

या इमारतीतील अंगडिया व्यापारी अमृत पटेल यांच्या घरात तिघा सशस्त्र हल्लेखोरांनी प्रवेश केला. संशयितांकडे गावठी बंदूक, चाकू व अन्य शस्त्र होती. श्री. पटेल नेमके दुकानातून घरी आले होते.

त्यामुळे हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा संशय आहे. घरात घुसताच त्यांनी चाकू व बंदूकीचा धाक दाखवून रोख रक्कम असलेली पिशवी पळविण्याचा प्रयत्न केला.

श्री. पटेल कुटुंबातील सदस्यांनी विरोध केला असता, संशयितांनी अमृत पटेल यांच्यासह तिघांवर चाकूने वार केले. यात एक जण जबर जखमी झाला. आरडाओरडा ऐकून इमारत मालक राहूल देवरे व अन्य रहिवासी धावून आले.

हल्लेखोर तरुण राहुल यांना जिन्यात धक्का देत पसार झाला. यावेळी वर्दळीच्या चौकात मोठी गर्दी असल्याने या भागातील तरूणांनी पाठलाग करत दोघांना पकडले. संतप्त जमावाने त्यांना जोरदार चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर व सहकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर छावणी पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला.

जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अटक केलेल्या दोघांची पोलिस कसून चौकशी करत होते.

श्री. भुसे यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन सविस्तर घटना जाणून घेत संशयितांविरुद्ध कठोर कारवाई करावी. घटनेची सखोल चौकशी करावी अश्या सुचना दिल्या.

परिसरातील रहिवाशांनी हल्लेखोरांना पकडणाऱ्या तरूणांचे कौतुक केले आहे. कबीर विजय सोनवणे (वय २२) व विलास उर्फ बंटी भरत पाटील (वय २२, दोघे रा. धुळे) या दोघांना हल्ला व दरोडा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दोघांकडून गावठी कट्टा व चाॅपर जप्त करण्यात आले आहेत. पोलिस फरार झालेल्या तिसऱ्या संशयिताचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT