मुख्य अंक पान ३ साठी
-----------
SNR26B23514
सिन्नर ः पंचाळेतील भोंदूबाबाविरोधात एमआयडीसी पोलिसांना निवेदन देताना अंनिसचे पदाधिकारी.
------------------
पंचाळेतील भोंदूबाबावर
कडक कारवाई करावी
-----------
अनिसचे सिन्नर पोलिसांना निवेदन
-----------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१३ ः दिंडोरी तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणीला तिच्या नातलगांनी पंचाळे येथील एका भोंदूबाबाकडे आणून अघोरी पूजा केल्याचा संशय आहे. याप्रकरणी भोंदूबाबावर जादुटोणाविरोधी कायदा तसेच अन्य इतर कायद्यान्वये कडक कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केली आहे. पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांना निवेदन दिले.
-----------
अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, राज्य सचिव ठकसेन गोराणे, जिल्हा सचिव अरुण घोडेराव, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके, सुनील कुऱ्हे, प्रभाकर चतुर यांनी हे निवेदन दिले आहे. त्यानुसार ३१ आॅक्टोबरला २२ वर्षीय तरुणीने एका तरुणाशी प्रेमविवाह केला. तथापि, मुलीच्या नातलगांनी तिला त्याच्या ताब्यात घेवून ४ नोव्हेंबरला पहाटे पंचाळे येथे भोंदूबाबाकडे आणले. सदर बाबाने मुलीला चहातून काहीतरी पावडर टाकून ते प्यायला दिले. अघोरी पुजेच्या माध्यमातून मंत्रोच्चार करत लिंबू तिच्या अंगावरुन उतरवून कापले व नदीत फेकायला सांगितले. एक लिंबू, धागा घेऊन तिच्या अंगावरील कपडा फाडून त्यात बांधले. या भोंदूबाबाने या ल्गनात राहिली तर तिचा पती पुढील दोन महिन्यात अकाली मरण पावणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी व्हावी, वस्तुस्थिती तपासण्यात यावी, अशी मागणी अंनिसने केली आहे.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.