fire esakal
नाशिक

नाशिक : शेतातील गवताच्या गंजीला आग; एकाचा मृत्यू

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : येथील लक्ष्मीनगर लगत असलेल्या शेतातील गवताच्या गंजीला आग लागली. या आगीत ५४ वर्षीय व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली असून वणी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नसून पोलिस याबाबत तपास करत आहेत.

येथील देवनदीजवळील लक्ष्मीनगर लगत असलेल्या मनोहर पवार यांच्या शेतात रचून ठेवलेल्या वाळलेल्या गवताच्या गंजीस बुधवारी (ता. २३) रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास आग लागली. यावेळी परीसरातील रहिवाशांनी पाण्याच्या बादल्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पोलिसांनाही रहिवाशांनी घटनेची माहिती कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत गवताच्या गंजीतून शेत मालक मनोहर पुंडलीक पवार (वय ५४, रा. वणी) यांना जळालेल्या अवस्थेत बाहेर काढले असता, त्यांना येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याबाबत वणी पोलिसांत नामदेव पुंडलिक पवार (वय, ४३) यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून आगीचे व मृत्युच्या कारणांचा पोलिस तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT