cabbage crop  Sakal
नाशिक

कोबीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव; पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

शरद भामरे


जुनी शेमळी (जि. नाशिक) : जुनी शेमळी (ता. बागलाण) येथील गावासह परिसरात कोबी पिकावर करपा, डावणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतातुर आहे. मोठ्या कष्टातून उभे केलेले पीक वाचविण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.


येथील परिसरात मोठ्या प्रमाणात कोबीचे उत्पादन घेतले जाते. ही कोबी गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, बडोदा मार्केटमध्ये विक्रीसाठी जाते. व्यापारीही शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कोबीची खरेदी करतात. मजुरांनाही रोजगार मिळतो. मात्र, या वर्षी परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने कोबी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. उत्पादन खर्चात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. येथील शेतकरी राहुल शेलार, श्रीराम वाघ, प्रशांत बच्छाव, रमेश शेलार यांनी दोन ते तीन एकरप्रमाणे कोबीची लागवड केली. मात्र, रोगांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

कोबी पिकावर महागडी औषधफवारणी करूनही बदलत्या वातावरणामुळे करपा रोग आटोक्यात येत नाही. जोरदार पाऊस झाला तरच पिके चांगली येतील.
- राहुल शेलार, शेतकरी, जुनी शेमळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT