Farmer Bhausaheb Daval Birari esakal
नाशिक

108 दिवसात नर्मदा परिक्रमा; 4 हजार किमी अंतर कापून मिळवला बहुमान

प्रकाश बिरारी

कंधाणे (जि. नाशिक) : येथील वारकरी तसेच शेतकरी असलेल्या भाऊसाहेब दावल बिरारी यांनी अतिशय कठीण व विशेष धार्मिक महत्व असलेली नर्मदा परिक्रमा (Narmada Parikrama) १०८ दिवसात चार हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी चालत पूर्ण केली. गावात परतल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची मिरवणूक काढून स्वागत केले. गावातून प्रथम नर्मदा परिक्रमा करण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.

लहानपणापासून भजन, कीर्तन, पारायण व वारीची आवड असलेल्या भाऊसाहेब बिरारी यांनी पंढरपूर, त्र्यंबकेश्‍वर व इतर धार्मिक वाऱ्या केल्या असून, गेल्या श्रावण महिन्यात सप्तश्रृंगगडासमोरील मार्केंडेय किल्ल्यावर पारायणासाठी गेले असताना तेथे दर्शनासाठी पुणे व अहमदनगर येथून आलेल्या साधू- महंतांनी नर्मदा नदीकिनारी असलेल्या शेकडो तिर्थक्षेत्र व परिक्रमेविषयीचे धार्मिक महत्व सांगितले. त्यांनी दिलेली माहिती व प्रेरणेतून त्यांनी मनाशी चंग बांधून मानसिक व शारीरिक तयारी सुरू केली होती. शेतीची सर्वस्वी जबाबदारी स्वतःवर असल्याने व उन्हाळ कांद्याच्या हुकमी पीकासाठी त्यांनी शेती मशागतीची सर्व कामे आटोपून फक्त कांदा बी- पेरणी करून लागवडीची जबाबदारी पत्नी व मुलाकडे सोपवून नर्मदा परिक्रमेसाठी मध्यप्रदेशातील ओंकारेश्‍वर (Onkareshwar) येथे रवाना झाले.

तेथूनच परिक्रमेबाबत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन तब्बल १०८ दिवस शेती, जंगली श्‍वापदे असलेल्या घनदाट जंगल, उंच डोंगर दऱ्याखोऱ्यातून निसर्गरम्य परिसरात चालताना स्वतः शेतकरी असल्याने तेथील शेती पिकांची पाहणी करीत व ‘नर्मदे हर नर्मदे हर’चा जयघोष करीत दिवसा नर्मदा परिक्रमा, ता रात्री आश्रमात झोप घेऊन परिक्रमेच्या मार्गावरील आदरातिथ्याचा आनंद घेतला. साडेतीन महिने आपल्या कुटुंबाला व महत्वपूर्ण उन्हाळ कांद्याचा हंगाम सोडून मोठ्या भक्तिभावाने खडतर समजली जाणारी परिक्रमा पूर्ण करून ते गावी परतले. ग्रामस्थांनी त्यांची मिरवणूक काढली. घरोघरी महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यांच्या कठोर परिश्रमाच्या भक्तीचे पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.

"परिक्रमा प्रवासात कोरीव काम केलेले सुंदर मंदिरे, भव्यदिव्य आश्रम आहेत. परिक्रमा करण्याऱ्या भाविकांविषयी रस्त्यावरील लहान- थोर, गरीब- श्रीमंत अशा सर्वांकडून आदराची भावना दिसून येते. आपापल्या परीने मदत व मार्गदर्शन ते करतात"

- भाऊसाहेब बिरारी, भाविक, कंधाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT