Farmers' rush to buy seeds starts on Friday esakal
नाशिक

Farmers Seed Purchase : शेतकऱ्यांची बियाणे खरेदीची लगबग! खरेदी करताना घ्यावी काळजी

सकाळ वृत्तसेवा

Farmers Seed Purchase : खरीप हंगाम जवळ आल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी अधिकृत कृषी केंद्रांवर लगबग सुरु झाल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यातील अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या घोटी बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

हवामान खात्याने वेळेत पर्जन्यमान होणार असल्याचे सांगितले असून तसे चित्र अजून स्पष्ट झालेले नसल्याने चिंतेत भर पडली आहे. (Farmers seed purchase rush Be careful while buying nashik news)

यंदा खरीप हंगामातील पेरण्यांनी जून महिन्याच्या सुरवातीलाच बियाणे पेरण्याची सुरवात केल्याचे दिसत आहे. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हवामानाचा अंदाज येत असल्याने पिकांचे नुकसान देखील कमी होत आहे.

शेतकरी बियाणाची खरेदी महाडीबीटीवर ऑनलाइन पद्धतीने करू शकतो. शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. बियाणांचे वेष्टण, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व पाकिटातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी.

भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांचे पाकिट सिलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करावी. त्याच बरोबर पाणी पडल्यावरच बियाणे टाकावी अशी सूचना तालुका आरोग्य अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाकिटावरील बियाणे वापरण्याची अंतिम मुदत व किंमत तपासून घ्यावी. तसेच, बियाणे बोगस निघाल्यास शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष दूरध्वनी टोल फ्री १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

"आदिवासी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत बोगस कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन प्रलोभने दाखवून बियाणे खरेदी करण्याची गळ घालताना दिसतात. बियाण्यांची खरेदी करताना अधिकृत कृषी केंद्र विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी."

- सोमनाथ काळे, अध्यक्ष, कृषी केंद्र असोसिएशन, इगतपुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT