Sabudana latest marathi news esakal
नाशिक

Shravan 2022 : उपवास महागला; साबुदाणा दरात 25 ते 30 रूपयांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा

कोकणगाव (जि. नाशिक : सध्या श्रावणमास सुरू असून, संबंध महिनाभर उपवास पाळला जातो. तर काही जण श्रावणी सोमवार व श्रावणी शनिवारच्या माध्यमातून उपवास पाळतात. त्यामुळे साबुदाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांनी दरवाढ झाल्याने सामान्यांचा उपवास महागला आहे. (Fasting becomes expensive Increase in sabudana price by 25 to 30 rupees Shravan 2022 Nashik latest marathi news)

तामिळनाडूतील सेलम येथून साबुदाणा संपूर्ण देशाला पुरविला जातो. यापैकी श्रावणात एकट्या महाराष्ट्रात ४ ते ५ लाख कट्ट्ट्यांची मागणी असते. परंतु, देशाला पुरवठा करण्यासाठी केवळ ३ लाख कट्टे शिल्लक असल्याने एकट्या महाराष्ट्राची भूक भागवणे आता शक्य नाही.

परिणामी, साबुदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपये किलोने वाढ झाली आहे. श्रावण सुरू होण्यापूर्वी साबुदाण्याचे दर प्रतिकिलो ५० ते ६० रुपये असे होते. मात्र, आज तेच दर ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहेत.

आधीच जीएसटीच्या माध्यमातून दूध, तूप, लोणी अशा घटकांची महाभाई व गॅस सिलिंडर दरातील वाढीमुळे जनता भरडली जात असताना आता उपवास पाळणे गरीबांच्या आवाक्यात राहिलेले नाही.

"गेल्या वर्षभरापासून तेल, शेंगदाणा, डाळ, गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आलेला आहे. त्यात साबुदाण्याचा उडालेला भडका. उपवास करावेत की नाही, असा प्रश्‍न पडतो." - निलीमा हारळे, गृहिणी

"श्रावण महिना असल्याने साबुदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी, मालाची आवक बाजारात कमी प्रमाणात आहे. साबुदाण्याच्या तुटवड्यामुळे दरवाढ झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना किरकोळ बाजारात ग्राहकांना माल देण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे."

- विवेक जैन, वृषभ ट्रेडर्स, टेहरे (मालेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Parbhani News: मनपाच्या करवसुली मोहिमेस ब्रेक; रोज केवळ १२ ते १३ लाखांची वसुली, विविध करांची परभणीत १६० कोटी बाकी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी युक्तीवाद संपला

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

SCROLL FOR NEXT