Crime Against Children Sakal Digital
नाशिक

जन्मदात्याने गळफास देत 'ती'ला जंगलात फेकले, स्थानिकांमुळे वाचले प्राण

विनोद बेदरकर

नाशिक : पोटच्या सहा वर्षाच्या लेकीला (Daughter) गळफास देत तिला जंगलात फेकून देण्याच्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी बापाला ताब्यात घेतले आहे. नकोशी झालेल्या या लेकीचा स्थानिकांच्या जागरुकतेमुळे जीव वाचला असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी नकोशी झाल्याने बापाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. (Father tries to kill daughter in Nashik)

बापालाच झाली नकोशी

दिंडोरी तालुक्यातील देहेरवाडी शिवारात शुक्रवारी (ता. ७) निर्जन जंगलात एका सहा वर्षाच्या मुलीला गळफास देउन कुणीतरी फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. योगायोगाने या भागातून चाललेल्या नारायण दौलत गांगुर्डे याच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्याने पोलिस पाटील साहेबराव विष्णु साळवे, योगेश लभडे आदींसह काही स्थानिकांच्या मदतीने जंगलात पडलेल्या मुलीला उपचारासाठी तातडीने गिरणारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराला दाखल केले. तेथे संबधीत मुलीवर उपचार करण्यात आले. मात्र बेशुध्द असल्याने गिरणारे केंद्राकडून तातडीने नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे आल्यावर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने तिच्यावर उपचार सुरु करीत, जीवंत असलेल्या चिमुरडीला वाचविण्याचा प्रयत्न केला. (Nashik Crime News)

मुलीला वाचविणाऱ्यांचे कौतुक

जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीतील ग्रामीण पोलिस दलातील हवालदार अजय नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलीच्या गळ्यावरील गळफासाच्या खुणा पाहून त्वरीत दिंडोरी पोलिसांना माहीती दिली. तसेच तिच्यासोबत तिला दाखल करायला आलेल्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी तपासाला गती दिली असता, संबधित मुलीची ओळख पटली तसेच तिच्या जन्मदात्या बापानेच तिला गळफास देउन मारण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आले. तसेच
प्रसंगाचे गांर्भीय ओळखून जंगलात पडून असलेल्या मुलीला त्वरीत आधी गिरणारे व त्यानंतर नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जनावरे चारणाऱ्या गुराखी आणि स्थानिकांचे कौतुक होत आहे.

...म्हणून 'ती' झाली नकोशी

दरम्यान या तपासात संबधित सहा वर्षाच्या मुलीच्या बापाने कुटुंबाला नकोशी झालेल्या या लेकीला गळफास दिल्याचे तपासात पुढे येते आहे. उपचार घेत असलेली मुलगी ही पहिल्या पत्नीची असून आता ती नकोशी झाली. दुसऱ्या पत्नीसोबत तिच्यामुळे वारंवार घरात भांडण होत असल्याने तिला संपविण्यासाठी बापानेच हे कृत्य केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी तिच्या बापाला ताब्‍यात घेतले आहे. घरगुती भांडणातून मुलगी नकोशी झाल्याने जंगलात नेऊन मुलीला संपवण्याचा प्लॅन या बापाने रचला होता. मात्र येथील गुराख्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. मुलगी नकोशी झाली म्हणून बापानेच तिचा काटा काढायचा प्लॅन केला होता. यासाठी दिंडोरी तालुक्यातील देहेरवाडीच्या जंगलात तिला आणले होते. यावेळी फासावर लटकवत असतांना गुराख्यांनी पाहिले. तिथून या बापाने धूम ठोकली. त्यामुळे एका नकुशीचा जीव वाचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT