पान-३ ॲंकर
--------
३६-४
गावागावात चाऱ्याची साठवणूक करावी
----------
जिल्हाधिकारी प्रसाद ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२ : उन्हाळ्यातील संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पिकांचे अवशेष जाळून न टाकता पशुधनासाठी चारा म्हणून ते जतन करावे. डोंगराळ भागातील नैसर्गिक गवताचे नियोजनबद्ध संकलन करून गावपातळीवर चारा साठा निर्माण करावा. उपलब्ध वैरणीसाठी कडबा कुट्टी यंत्राचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण, दिंडोरी व बागलाण या डोंगराळ भागांमध्ये पावसाळ्यानंतर नैसर्गिक गवत उपलब्ध होते. हे गवत वाळून नष्ट किंवा वणव्यामध्ये जळण्यापूर्वी योग्य वेळी त्याची कापणी करावी. सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवणूक करावी. ग्रामपंचायत, पशूपालक, शेतकरी गट व महिला बचतगट यांच्या सहभागातून गावनिहाय गवत संकलन मोहीम राबवावी. सार्वजनिक जमिनीवरील गवताचे संकलन संबंधित विभागाच्या परवानगीने, तर वनक्षेत्रातील संकलन वन विभागाच्या नियमांनुसार आवश्यक मंजुरी घेऊन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
---
१६-१
पिकांचे अवशेष मौल्यवान चारा
खरीप हंगामानंतर शेतात उपलब्ध होणारे भाताचे पिंजर, मक्याचा कडबा, ज्वारी-बाजरीची ताटे व इतर पिकांचे अवशेष न जाळता ते व्यवस्थित वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावे. कडबा कुट्टी यंत्राच्या साहाय्याने ज्वारी- बाजरीचा कडबा, मक्याची ताटे, भाताचे पिंजर व इतर योग्य वैरणीचे पशुधनाच्या प्रकारानुसार बारीक तुकडे करत ती जनावरांना खाण्यास द्यावेत.
---
चारा बँक निर्माण करावी
ग्रामपंचायत, दुग्ध सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचतगटांच्या सहभागातून पिकांचे अवशेष आणि नैसर्गिक गवताचे संकलन करून गावपातळीवर चारा बँक निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अतिरिक्त चारा गरजू पशुपालकांना उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे.
--------------------
कोट
ग्रामपंचायतींनी गावनिहाय चारा संकलन व साठवणुकीचे नियोजन करावे. पशुसंवर्धन व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी चारा संवर्धन, कुट्टी, साठवणूक आणि योग्य पशुआहार व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
- ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.