Grandfather, mother-father, brothers and sisters and relatives taking funeral darshan of Jawan Shriram from Dhanore (Nifad). esakal
नाशिक

Nashik News: धानोरे येथील जवानाला अंतिम निरोप; आजोबा, आई-वडिलांनी फोडला हंबरडा, जनसमुदायाचे मन हेलावले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भारतीय सैन्यदलातील सुट्टीवर आलेले जवान श्रीराम राजेंद्र गुजर (२४) यांच्यावर धानोरे (ता. निफाड) येथे आज (ता.१८) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंतिम निरोप देताना वयोवृद्ध आजोबा, आईवडिलांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे मन हेलावणारा होता. मातापित्यांचा आक्रोश पाहून जनसमुदायालाही अश्रू अनावर झाले. (Final farewell to Dhanore jawan shreeram gujar Grandpa parents broke hambarda shook hearts of crowd Nashik News)

श्रीराम हे भारतीय सैन्यदलात आसाम (गुवाहाटी) येथे बॉम्बे इंजिनिअर कोर २३६ IET युनिट मध्ये शिपाई जहाज ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर होते. गावी सुटीवर आलेले असताना रविवारी (ता.१६) त्यांचा अपघात झाला, उपचारादरम्यान सोमवारी (ता.१७) त्यांचे निधन झाले.

देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरचे सुभेदार टी. ख्रिस्तोफर यांच्या जवानांच्या तुकडीने व पंचक्रोशीतील माजी सैनिक, लासलगाव पोलिसांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली.

तत्पूर्वी फुलांनी सजविलेल्या सैन्यदलाच्या रथातून श्रीराम यांची घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.'ए मेरे वतन के लोगो...' या गीताची धून व 'भारत माता की जय','वंदे मातरम...','श्रीराम भय्या,अमर रहे...' या घोषणा देत उपस्थित जनसागराने साश्रूनयनांनी श्रीराम यांना अखेरचा निरोप दिला.

जवान श्रीराम यांचे आजोबा संतू गुजर, वडील राजेंद्र, आई अनिता, भाऊ नितीन, बहिण प्रियंकासह नातेवाइकांनी श्रीराम यांना अखेरचा दंडवत तुला...!!! असा आक्रोश करताच उपस्थित जनसमुदायाचे मन हेलावले. भाऊ नितीन याने अग्निडाग दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

देवळाली कॅम्प ६ फिल्ड रेजिमेंटचे सुभेदार टी. ख्रिस्तोफर, नायब सुभेदार मस्के, उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, मंडळ अधिकारी संतोष डुंबरे, पोलिस निरीक्षक दौलत जाधव, बाळासाहेब पगारे,

त्रिदल सैनिक संघाचे अध्यक्ष तुषार खरात, कॅप्टन मार्तंड दाभाडे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, माजी सरपंच विनोद जोशी, राष्ट्रवादीचे शाहू शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, बाबासाहेब गुजर, पोलिसपाटील अरुण गुजर, योगेश झुरळे, केदारनाथ तासकर, अंकुश तासकर आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्मारक व्हावे ही वडिलांची इच्छा

मुलाची देशसेवेची इच्छा अकाली निधनामुळे अपूर्ण राहिली असली तरी तो नक्कीच सर्व देशवासीयांच्या स्मरणात राहील.

त्यामुळे त्याचे स्मारक व्हावे यासाठी वडील राजेंद्र यांनी प्रांत हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे व लासलगावचे राहुल वाघ यांची अक्षरशः विनवणी केली. स्मारकाबाबत मदत केली जाईल असे संबंधितांनी आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT