exam.jpg
exam.jpg 
नाशिक

अंतिम वर्षाच्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन-ऑफलाइनचा पर्याय; पुणे विद्यापीठाचा निर्णय

अरुण मलाणी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अखेर अंतिम वर्ष, अंतिम सत्र विद्यार्थ्यांच्‍या परीक्षेसंदर्भात दिशानिर्देश बुधवारी (ता.९) जारी केले आहेत. परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना आता परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्‍वरूपात देण्याविषयी विकल्‍प उपलब्‍ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षापद्धती निवडीसाठी विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर रविवार (ता.१३)पर्यंत विकल्‍प अर्ज सादर करायचा आहे. बहुपर्यायी वस्‍तुनिष्ठ (एमसीक्‍यू) स्‍वरूपातून एक तास कालावधीची परीक्षा घेतली जाणार आहे. 

विकल्‍प अर्जाची रविवारपर्यंत मुदत 

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांच्‍या धोरणानंतर तसेच सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या निर्देशांनुसार व राज्‍यपालांनी सूचित केल्‍याप्रमाणे अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्यांच्‍या नियमित व अनुशेषांतर्गत लेखी परीक्षा, तसेच प्रात्‍यक्षिक, मौखिक परीक्षा पार पडणार आहे. यासंदर्भात पुणे विद्यापीठाने गठीत केलेल्‍या समितीने परीक्षा पद्धतीबाबत निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्‍ही पर्याय उपलब्‍ध करून दिले जाणार आहेत. घरी राहून परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्‍ध केली आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाइनही परीक्षा देता येईल. याबाबत पुणे विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर विद्यार्थ्यांच्‍या लॉग इन आयडीवरून विकल्‍प अर्ज उपलब्‍ध करून दिले आहे. विकल्‍प अर्ज भरण्याची मुदत रविवारी (ता.१३)पर्यंत असणार आहे. 

अशी पार पडेल परीक्षा 

यापूर्वी न झालेल्‍या प्रात्‍यक्षिक, मौखिक, प्रकल्‍प, चर्चासत्र परीक्षा १५ ते २५ सप्‍टेंबरदरम्‍यान ऑनलाइन पद्धतीने घेतल्‍या जातील. परीक्षांसंदर्भातील रेकॉर्डिंग महाविद्यालयांना जतन करून ठेवावी लागणार आहे. अंतिम सत्रामधील अंतिम वर्षामधील विद्यार्थ्यांच्या अनुशेषांतर्गत (बॅकलॉग) परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रकास परीक्षा व मूल्‍यमापन मंडळाने मान्‍यता दिली आहे. त्‍यानुसार १ ते ९ ऑक्‍टोबरदरम्‍यान ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने या परीक्षा घेतल्‍या जातील. नियमित विद्यार्थ्यांच्‍या परीक्षा १० ते ३० ऑक्‍टोबरदरम्‍यान ऑनलाइन, ऑफलाइन विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्‍या पर्यायानुसार घेतल्‍या जाणार आहेत. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍नांद्वारे (एमसीक्‍यू) एक तासाच्या कालावधीची असेल. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जारी केले जाईल. 

सर्वोच्च न्‍यायालयाचे निर्देश व राज्‍यपाल तथा कुलपतींच्‍या सूचनेनुसार अंतिम वर्ष, अंतिम सत्र परीक्षा घेण्यासंदर्भात पुणे विद्यापीठाने आराखडा तयार केला आहे. विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांच्‍या हितांचा विचार करत ऑनलाइन व ऑफलाइन असे परीक्षेसाठी दोन्‍ही पर्याय उपलब्‍ध केले आहेत. विहित मुदतीत विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी विकल्‍प अर्ज सादर करावे व कसून अभ्यास करावा. - प्राचार्य डॉ. व्‍ही. बी. गायकवाड, व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT