HAL
HAL  Google
नाशिक

HALच्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य योजना लागू

उत्तम गोसावी

ओझर (जि. नाशिक) : अकाली मृत्यू झालेल्या एचएएल (Hindustan Aeronautics Limited) कामगारांच्या वारसास ‘मृत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांसाठी आर्थिक सहाय्य योजने’अंतर्गत कामगारांच्या निवृत्ती वयापर्यंत दरमहा आर्थिक सहाय्य मिळणार आहे. एचएएल कामगार संघटनेने केलेल्या मागणीला यश आले आहे, अशी माहिती अखिल भारतीय एचएएल समन्वय समितीचे प्रवक्ते व कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी दिली. (financial assistance scheme for inheritance of HAL workers who died prematurely)


ढोमसे म्हणाले, की कोरोना महामारीच्या कठीण काळात संपूर्ण देशात अराजकता निर्माण झाली असून, मोठी जीवित हानी झाली. अनेक एचएएल कामगार बांधवांचादेखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकाली मृत्यू होणाऱ्या कामगारांच्या कुटुंबीयांची परिस्थिती विचारात घेता त्यांच्या कुटुंबीयांतील वारसास नोकरी द्यावी किंवा आर्थिक मदत म्हणून दरमहा रक्कम देणारी योजना द्यावी, अशी मागणी एचएएल कामगार संघटनेकडून करण्यात आली होती. संघटनेच्या या मागणीला यश आले असून, ‘एचएएल कुटुंब’ ही भावना डोळ्यांपुढे ठेवत ऐतिहासिक अशी योजना व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.


या योजनेत एचएएल परिवारातील १ जानेवारी २०२० नंतर आत्महत्या वगळता कुठल्याही कारणाने मृत्यू झालेल्या कामगार व अधिकारी बांधवांच्या वारसास पती, पत्नी किंवा सहचारी मृत असतील तर २१ वर्षांखालील मुलगा, अविवाहित २५ वर्षांखालील मुलगी यांना दरमहा १५ हजार रुपयांपासून ते २० हजार रुपयांपर्यंतच्या वेतन श्रेणीनुसार आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही मदत मृत कामगाराच्या निवृत्तीच्या वयापर्यंत देण्यात येणार आहे.



एचएएल परिवारातील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना या योजनेचा नक्की आधार होईल. सार्वजनिक उपक्रम असलेल्या एचएएल कंपनीमध्ये व्यवस्थापनाकडून कामगार आणि अधिकारीवर्गाच्या कुटुंबीयांची काळजी करत चांगली योजना राबविण्यात आली आहे. केंद्र सरकार, संरक्षण मंत्रालयाची दुसरी चांगली योजना आल्यास ती योजना लागू करण्याचे देखील मान्य करण्यात आले आहे.
-सचिन ढोमसे, सरचिटणीस, एचएएल कामगार संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT