Tree Cutting esakal
नाशिक

Nashik Tree Cutting : विनापरवानगी वृक्षतोडप्रकरणी व्यावसायिकासह महाविद्यालयास 3 लाखाचा दंड

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tree Cutting : येथील नामांकित महाविद्यालय आणि बांधकाम व्यावसायिक रतन अवस्ती यांनी विनापरवानगी वृक्षतोड केल्याप्रकरणी पंचवटी उद्यान विभागाकडून दोघांना तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. (fine of 3 lakhs in case of cutting of trees without permission nashik news)

पंचवटीतील आडगाव शिवारातील जत्रा नांदूर लिंक रोड येथील खासगी प्लॉटमधील बोर, बाभूळ आणि सुबाभूळ असे एकूण ३ झाडे बांधकामास अडथळा ठरत असल्याने बांधकाम व्यावसायिक श्री. अवस्ती यांनी ऑगस्ट महिन्यात महापालिकेची पूर्व परवानगी न घेता तोडल्याचे समोर आले आहे. या अवैध वृक्षतोडीबद्दल अवस्ती यांना १ लाख १० हजार रुपये दंड करण्यात आला.

दुसरी घटना दिंडोरी रोडवरील एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारात घडली होती. महाविद्यालयाने आवारातील १ वडाचे आणि १ रेन ट्री असे दोन झाडे १५ सप्टेंबर रोजी महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अवैध पद्धतीने तोडल्याचे समोर आले होते.

या अवैध वृक्षतोडी प्रकरणी संस्थेस १ लाख ९० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदरची करण्यात आलेली दंडात्मक कारवाईतील दंडाची रक्कम ४ दिवसांच्या मुदतीत भरायची असून महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५ चे कलम २१(१) नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक महापालिकेचे पंचवटी विभागीय अधिकारी व उद्यान निरीक्षक यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Delhi Tragedy : ‘तू ड्रामा करता है...’ असे म्हणत शिक्षकांनी छळलं!, अवघ्या १५ वर्षीय शौर्यला सरांनीच टोकाचं पाऊल उचलायला प्रवृत्त केलं; चिठ्ठीतून उलगडा

Latest Marathi News Live Update : अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ

Headache Relief: औषधांशिवाय डोकेदुखीवर मिळवा आराम ! घरच्या घरी आजच करा 'हे' 9 सोपे उपाय

IND vs SA, 2nd Test : भारत पुन्हा टॉस हरला; दक्षिण आफ्रिकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; गिलच्या जागी कुणाला संधी? पाहा टीम इंडियाची प्लेईंग XI

Mumbai Local Megablock: रेल्वेमार्ग रविवारी मंदावणार! बेलापूर आणि पनवेलदरम्यान विशेष ब्लॉक; वेळापत्रकात बदल

SCROLL FOR NEXT