Fire Accident
Fire Accident esakal
नाशिक

Nashik News : सोयगावचे मविप्र महाविद्यालय परिसरात अग्नितांडव; जीवितहानी नाही

राजेंद्र दिघे

मालेगाव (जि. नाशिक) : सोयगाव येथील मविप्र समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय परिसरात बुधवारी (ता.२९) सायंकाळी पाचच्या सुमारास गिरणा किनाऱ्याकडून अर्धा किलोमीटर अंतरावरून अकस्मित आग लागली.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महाविद्यालय परिसरातील हिरवी झाडे मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाली आहे.

ही आग एवढी भयंकर होती की आजूबाजूचा महाविद्यालय परिसर दिसेनासा झाला. महाविद्यालयाचे वॉचमने काही प्रमाणात आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आग आटोक्यात येणार नाही म्हणून त्यांनी तत्परतेने प्राचार्य डॉ. हिरामण क्षिरसागर यांचेशी संपर्क केला.

प्राचार्य डॉ क्षिरसागर यांनी मविप्रचे संचालक अँड.आर के बच्छाव यांना घटना कळवली. अँड.बच्छाव यांनी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला.अग्निशामक पथकाने ताबडतोब दोन गाड्या महाविद्यालयाच्या परिसरात पाठवून ही आग आटोक्यात आणली.

या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी जरी झाली नसली तरी ही आग कशी ? व का लागली असावी हा प्रश्न अनुत्तरित आहे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या व महाविद्यालयाची सर्व गोपनीय कागदपत्रे असतात.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ही आग महाविद्यालयास अवघ्या वीस मीटर अंतरापर्यंत पोहोचली होती. जवळच सायन्स लॅब होती. जर या आगीने महाविद्यालयाला घेरले असते तर आज मोठा अनर्थ होऊ शकला असता ॲड.बच्छाव यांनी अग्निशामक दलास सांगितला. यावेळी

अग्निशमन अधिकारी संजय पवार, फायरमन मोहन बैरागी, विकास बोरगे, शेख वाजी, प्रदीप शिंदे, जयेश सोनवणे, किरण सूर्यवंशी यांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली.यावेळी भाजपा सुनील गायकवाड, गटनेते नगरसेवक मदन गायकवाड, मधुकर पाटील प्रा. डॉ.बी एम आहिरे, ग्रंथपाल डॉ. अरुण पठाडे, निलेश पाटील, लिपीक बी.के बच्छाव व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT